IPL 2021 : पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारतात आला, शाहिद आफ्रिदीच्या टीकेचा सामना केला अन् आता मुंबई इंडियन्ससाठी धमाका करणार!

IPL 2021 Mumbai Indians मुंबई इंडियन्सचा संघ विजयीपथावर येण्यासाठी उत्सुक आहे आणि दुसऱ्या लढतीत त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे. या सामन्यात MIचा स्फोटक फलंदाज परतणार असल्याने रोहित शर्मा खूश झाला आहे.

Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी फार खास राहिली नाही. २०१३पासून सुरू असलेलं पहिल्या सामन्यातील पराभवाचे सत्र MIनं याही वेळेस कायम ठेवले. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं त्यांना पराभूत केलं.

या सामन्यात ख्रिस लीननं ( Chris Lynn) पदार्पणातच ४९ धावांची खेळी केली होती. पण, आता कोलकाता नाईट रायडर्सविुरद्ध ( KKR) बुधवारी होणाऱ्या सामन्यात लीनला बाकावर बसवले जाऊ शकते. कारणच तसे आहे... आयपीएलसाठी ज्या खेळाडूनं पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून भारत गाठले, तो खेळाडू KKRविरुद्धच्या सामन्यासाठी फिट झाला आहे.

पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका अर्ध्यावर सोडून क्विंटन डी कॉक ( मुंबई इंडियन्स), कागिसो रबाडा व अॅनरिच नॉर्टजे ( दोघंही दिल्ली कॅपिटल्स), लुंगी एनगिडी ( चेन्नई सुपर किंग्स ) आणि डेव्हिड मिलर ( राजस्थान रॉयल्स) हे भारतात दाखल झाले.

BCCIच्या नियमानुसार या सर्वांना ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागला आणि मुंबई इंडियन्सचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असून तो दुसऱ्या सामन्यासाठी निवडीसाठी उपलब्ध असल्याचे झहीर खाननं सांगितले. हा खेळाडू म्हणजे MIचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक.

क्विंटन हा MIचा महत्त्वाचा खेळाडू आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन ही सलामीची जोडी प्रतिस्पर्धी संघांना हतबल करते. पहिल्या सामन्या दरम्यान क्विंटन क्वारंटाईन होता आणि आता त्यानं ७ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे त्याच्या येण्यानं ख्रिस लीगचा पत्ता कट होईल, हीच दाट शक्यता आहे.

क्विंटननं मागील पर्वात १६ सामन्यांत ३५.९२च्या सरासरीनं चार अर्धशतकांसह ५०३ धावा चोपल्या होत्या. आयपीएलमध्ये त्यानं एकूण ६६ सामन्यांत १ शतक व १४ अर्धशतकांसह १९५९ धावा केल्या आहेत.

यावरून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी खवळला. त्यानं पाकिस्तानच्या मालिका विजयाचा आनंद साजरा न करता दक्षिण आफ्रिकेला खडेबोल सुनावले आणि आयपीएलबाबत वादग्रस्त विधान केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आयपीएलचे वर्चस्व वाढताना दिसत आहे, असा आरोप त्यानं केलं. तो पुढे म्हणाला,''दक्षिण आफ्रिकेनं मालिका सुरू असताना खेळाडूंना आयपीएलसाठी परवानगी दिली, हे पाहून आश्चर्य वाटत आहे. एखादी ट्वेंटी-२०लीग आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर भारी पडताना दुःख होत आहे. याबाबत पुन्हा विचार करण्याची गरज आहे.''

Read in English