Join us  

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : राजस्थान रॉयल्सचा जबरदस्त पलटवार; कोलकाता नाईट रायडर्सचा पराभवाचा चौकार

IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score :  माफक लक्ष्याचा पाठलाग करताना RRच्या फलंदाजांनी कोणतेच जोखमीचे फटके मारले नाही. संजू सॅमसननं कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमानं KKRच्या गोलंदाजांचा सामना केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 11:15 PM

Open in App

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज सर्व आघाड्यांवर बाजी मारली.  ख्रिस मॉरिसनं KKRच्या डावाला मोठे भगदाड पाडले. शुबमन गिल व इयॉन मॉर्गन यांनी RRला विकेट्स गिफ्ट दिल्या. राहुल त्रिपाठी व दिनेश कार्तिक वगळता KKRच्या अन्य फलंदाजांनी शरणागती पत्करली. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना RRच्या फलंदाजांनी कोणतेच जोखमीचे फटके मारले नाही. संजू सॅमसननं कर्णधाराला साजेशी खेळी करताना संयमानं KKRच्या गोलंदाजांचा सामना केला. राजस्थान रॉयल्सनं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. KKRनं पराभवाचा चौकार खेचला. चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video

सुभमन गिल ( ११)  जीवदान मिळूनही करिष्मा दाखवता आला नाही. नितीश राणा ( २२)  व राहुल त्रिपाठी या जोडीनं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पंरतु चेतन सकारियानं त्यांची जोडी तोडली. KKRचा मंदावलेली धावांच गती वाढवण्यासाठी सुनील नरीनला प्रमोशन दिलं, परंतु हाही डाव फसला. कर्णधार इयॉन मॉर्गनला डायमंड डकवर बाद होऊन माघारी परतावे लागले. राहुल त्रिपाठी २६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३६ धावांवर बाद झाला.  IPL 2021, IPL 2021 latest news, RR Vs KKR IPL Matchesवर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video

आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीची सर्वांना प्रतीक्षा होती, परंतु ख्रिस मॉरिसनं त्याला ( ९) धावांवर माघारी पाठवले. मॉरिसनं त्याच षटकात दिनेश कार्तिकलाही ( २५) माघारी पाठवले. चेतन सकारियानं हवेत झेपावत अफलातून झेल घेतला. मुश्ताफिजूर ( १-२२), जयदेव उनाडकट ( १-२५) आणि चेतन सकारिया ( १-३१) यांनी सुरेख स्पेल टाकला. ख्रिस मॉरिसनं २३ धावांत चार विकेट्स घेत KKRला २० षटकांत ९ बाद १३३ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. IPL 2021 RR Vs KKR, RR Vs KKR Live Match वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video

प्रत्युत्तरात, KKRच्या गोलंदाजांनीही पहिल्या काही षटकांत चांगली गोलंदाजी केली. पॅट कमिन्सचा बाऊन्सर जोस बटलरच्या जबड्यावर आदळल्या, प्राथमिक उपचारानंतर तो मैदानावर खेळत राहिला. बटलर चौथ्या षटकात वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. IPL 2021त पहिलाच सामना खेळणाऱ्या यशस्वी जैस्वालनं फटकेबाजी केली, परंतु १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत एकत्र खेळणाऱ्या शिवम मावीनं त्याला ( २२) माघारी पाठवले. RRनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये २ बाद ५० धावा केल्या. KKRनं पॉवर प्लेमध्ये केलेल्या धावांच्या त्या दुप्पट होत्या. RR Vs KKR IPL Matches, RR Vs KKR IPL match 2021 Shoaib Akhtar : भारताला मदतीची गरज; त्यांच्यासाठी दान करा, त्यांना निधी गोळा करून द्या - शोएब अख्तर

शिवम दुबे व संजू सॅमसन संयमानं खेळ करताना RRचा धावफलक हलता ठेवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी केली. वरुण चक्रवर्थीनं टाकलेल्या ११व्या षटकात शिवम ( २२) बाद झाला. राहुल टेवाटिया पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करताना दिसला, परंतु ८ चेंडू ( ५ धावा) खेळून तो झेलबाद झाला. KKRच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा उचलताना सामना चुरशीचा बनवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या पाच षटकांत RRला ३० धावा हव्या होत्या. अखेरच्या षटकांत KKRकडून गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. RRनं हा सामना सहज जिंकला. डेव्हिड मिलर २३ धावांवर नाबाद राहिला, तर संजू सॅमसन ४२ धावांवर नाबाद राहिला. RRनं १८.४ षटकांत ४ बाद १३४ धावा केल्या. 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसनकोलकाता नाईट रायडर्स