IPL 2021, RR Vs KKR T20 Live : चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज सर्व आघाड्यांवर बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 10:06 PM2021-04-24T22:06:25+5:302021-04-24T22:10:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Chetan Sakariya takes flight to catch &  Riyan Parag celebration style goes viral, Video | IPL 2021, RR Vs KKR T20 Live : चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video

IPL 2021, RR Vs KKR T20 Live : चेतन सकारियाची फ्लाईंग कॅच अन् रियान परागचं सेल्फी सेलिब्रेशन; Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 RR Vs KKR live match score updates Mumbai : राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) आज सर्व आघाड्यांवर बाजी मारली. नाणेफेकिचा कौल जिंकल्यानंतर संजू सॅमसननं कोलकाता नाईट रायडर्सला ( Kolkata Knight Riders) प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं आणि त्यांना ९ बाद १३३ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. या सामन्यात रियान पराग ( Riyan Parag) यानं सर्वांचं मनोरंजन केलं, तर चेतन सकारियाच्या फ्लाईंग कॅचनं दिनेश कार्तिकला माघारी पाठवले.  वर्ल्ड कप विजेता कर्णधार असा विचित्र बाद होऊ शकतो?; इयॉन मॉर्गनच्या विकेटनंतर KKRनं डोक्यावर मारला हात, Video

शुबमन गिल ( ११)  जीवदान मिळूनही आज करिष्मा दाखवता आला नाही.  नितीश राणा ( २२)  व राहुल त्रिपाठी या जोडीनं धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, पंरतु चेतन सकारियानं त्यांची जोडी तोडली. KKRचा मंदावलेली धावांच गती वाढवण्यासाठी सुनील नरीनला प्रमोशन दिलं, परंतु जयदेव उनाडकटच्या स्लोव्हर बाऊन्सरवर पुल मारण्याचा प्रयत्न फसला. यावेळी यशस्वी जैस्वालनं चूक न करता अफलातून झेल टिपला. कर्णधार इयॉन मॉर्गनला डायमंड डकवर बाद होऊन माघारी परतावे लागले राहुल त्रिपाठी २६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह ३६ धावांवर बाद झाला.  IPL 2021, IPL 2021 latest news, RR Vs KKR IPL Matches IPL 2021 : RR Vs KKR T20 Live Score Update 

आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीची सर्वांना प्रतीक्षा होती, परंतु ख्रिस मॉरिसनं त्याला ( ९) धावांवर माघारी पाठवले. मॉरिसनं त्याच षटकात दिनेश कार्तिकलाही ( २५) माघारी पाठवले. चेतन सकारियानं हवेत झेपावत अफलातून झेल घेतला. मुश्ताफिजूर ( १-२२), जयदेव उनाडकट ( १-२५) आणि चेतन सकारिया ( १-३१) यांनी सुरेख स्पेल टाकला. ख्रिस मॉरिसनं २३ धावांत चार विकेट्स घेत KKRला २० षटकांत ९ बाद १३३ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. IPL 2021 RR Vs KKR, RR Vs KKR Live Match

Web Title: IPL 2021 RR Vs KKR Live T20 Score : Chetan Sakariya takes flight to catch &  Riyan Parag celebration style goes viral, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.