Join us  

IPL 2021, RCB Vs DC T20 Live : ...अन् विराट कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला; जाणून घ्या काय भन्नाट किस्सा घडला!

एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:22 PM

Open in App

ipl 2021 t20 RCB Vs DC live match score updates Ahmedabad : एबी डिव्हिलियर्सच्या फटकेबाजीमुळे RCBनं ५ बाद १७१ धावांचा डोंगर उभा केला अन् त्याचा पाठलाग करताना DC च्या फलंदाजांची दमछाक उडताना पाहायला मिळत आहे. दिल्ली कॅपिटल्सचे चार फलंदाज ४७ धावांत माघारी परतले होते. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला आणखी एक विकेट मिळाली असती, परंतु मैदानावरील अम्पायरचा हा निर्णय जेव्हा बदलला गेला तेव्हा विराट कोहलीच्या चेहऱ्याची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. अमित मिश्रानं मोठी चूक केली; नशीब अम्पायर्सनी फक्त ताकिद दिली, नाहीतर..

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ( Royal Challengers Banglore) साजेशी सुरुवात करता आली नाही. आवेश खाननं चौथ्या षटकात विराट कोहलीला ( १२) आणि इशांत शर्मानं पाचव्या षटकात देवदत्त पडीक्कलला ( १७) माघारी पाठवले. अमित मिश्रानं RCBला मोठा धक्का देताना ग्लेन मॅक्सवेलला ( २५)  माघारी जाण्यास भाग पाडले. एबी डिव्हिलियर्स व रजत पाटिदार यांनी RCBचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३८ धावांत ५४ धावांची भागीदारी केली. पाटिदार  २२ चेंडूंत २ षटकार मारून ३१ धावांवर माघारी परतला. एबीनं २०व्या षटकात २३ धावा कुटल्या. तो ४२ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. RCBनं ५ बाद १७१ धावा केल्या.  IPL 2021, IPL 2021 latest news, RCB Vs DC IPL Matches एबी डिव्हिलियर्स एकटा भिडला, दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करताना मोठा पराक्रम केला!

प्रत्युत्तरात दिल्लीला झटपट धक्के बसले. धावफलकावर २३ धावा असताना शिखर धवन ( ६) माघारी परतला अन् त्यानंतर स्टीव्ह स्मिथ ( ४) माघारी परतला. त्यामुळे दिल्लीला २८ धावांत दोन धक्के बसले होते. ७व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरनं दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याच्यासाठी LBWची अपील केली अन् मैदानावरील अम्पायरनी त्याला बाद ठरवले. पण, रिषभनं DRS घेतला तेव्हा चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी बॅटला लागला होता आणि त्यामुळे मैदानावरील अम्पायरना त्यांचा निर्णय बदलावा लागला. हे सर्व मोठ्या स्क्रीनवर पाहताना विराटचा चेहरा बघण्यासारखा होता.   

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्सरिषभ पंत