Join us

IPL 2021: पांड्या बंधुंच्या स्वॅगला तोड नाही!, हार्दिक अन् कृणालचा पत्नींसोबत डान्स, पाहा VIDEO

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्समधील पांड्या बंधुंची जशी मैदानात चर्चा असते तशीच सोशल मीडियातही दोघं स्टार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 14:26 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलचं यंदाच्या १४ व सीझन सुरू आहे आणि यंदाच्या सीझनमध्येही टी-२० सामन्यांचा थरार जवळपास प्रत्येक सामन्यात अनुभवयाला मिळत आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्समधील पांड्या बंधुंची जशी मैदानात चर्चा असते तशीच सोशल मीडियातही दोघं स्टार आहेत. 

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video 

हार्दिक आणि कृणाल पांड्याचे सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स आहेत. दोघंही त्यांच्या हटके स्वॅगसाठी ओळखले जातात. हार्दिक आणि कृणाल त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर मजेशीर व्हिडिओ देखील शेअर करत असतात. त्यात हार्दिक पांड्या नेमही आघाडीवर असतो. आता हार्दिकनं असाच एक धमाल व्हिडिओ पोस्ट केलाय. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक, कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मा असे चौघंही डान्स करत असतानाचा व्हिडिओ हार्दिकनं शेअर केला आहे. हॉलिवूडचा सुपरस्टार गायक जस्टीन बीबरच्या गाण्यावर चौघं डान्स करत आहेत. 

नताशानं देखील इन्स्टाग्रामवर चौघांचा फोटो पोस्ट करत 'द पांड्या स्वॅग', असं कॅप्शन दिलं आहे. चौघांनीही हटके स्टाईलनं डान्स करत स्माईलीचा फोटो असलेलं टी-शर्ट परिधान केलं आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यामुंबई इंडियन्सआयपीएल २०२१