Join us  

IPL 2021 : आयपीएल फ्रँचायझींसाठी नसेल नाईट कर्फ्यू; महाराष्ट्र सरकारनं दिली सूट!

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यानं ९ एप्रिलला आयपीएल २०२१ला सुरुवात होणार आहे. पण, मुंबईत १० एप्रिलला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 10:54 AM

Open in App

Indian Premier League 2021 : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी राज्य सरकारनं कडक निर्बंध जाहीर केल्यानंतर मुंबईतील आयपीएलच्या ( IPL 2021) सामन्यांबाबत अनिश्चितता होती. पण, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएलचे सामने मुंबईत होतील, अशी माहिती देताना BCCIला हिरवा कंदील दाखवला. ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून राज्य सरकारनं त्यासंदर्भातली नियमावलीही जाहीर केली आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांच्यासह मुंबईत दाखल झालेल्या आयपीएल फ्रँचायझींना महाराष्ट्र सरकारनं सूट दिली आहे. त्यांच्यासाठी रात्री ८ नंतर लागू होणारं कलम १४४ नसणार आहे. त्यामुळे फ्रँचायझी ८ नंतर सराव करू शकतात. ( Maharashtra government allowing franchises to even train after 8 PM). पण, त्यांना बायो बबल व सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करावं लागेल. KKRच्या शुबमन गिलनं दाखवला ट्रेलर; SRH विरुद्धच्या सामन्यापूर्वी ३५ चेंडूंत कुटल्या ७६ धावा

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Mumbai Indians Vs Royal Challengers Bangalore) यांच्या सामन्यानं ९ एप्रिलला आयपीएल २०२१ला सुरुवात होणार आहे. पण, मुंबईत १० एप्रिलला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. ''सामन्याची वेळ लक्षात घेऊन संघ CCI व MCA येथे दोन सत्रात सराव करत आहेत. सायंकाळी ४ ते ६.३० आणि ७.३० ते १० अशा या दोन सत्रांत खेळाडू सराव करणार आहेत,''असे आप्तकालीन विभागाचे सचिव श्रीरंग घोलप यांनी बीसीसीआयला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. कोरोनाचा विस्फोट; १४ सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मुंबईतील हॉटेलमध्ये केलंय क्वारंटाईन

''त्यामुळे रात्री ८ वाजल्यानंतर संघ व आयपीएल स्टाफना मैदानावर सराव करण्याची संधी देत आहोत. मैदान ते हॉटेल अशा प्रवासाचीही त्यांना परवानगी दिली जात आहे. त्यांनी बायो बबल व अन्य नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहेत,''असे त्या पत्रात नमूद केले आहे. वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र 

वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने

१० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स१२ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स१५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स१६ एप्रिल - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स१८ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स१९ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स२१ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स२२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स२४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स२५ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

टॅग्स :आयपीएल २०२१महाराष्ट्रकोरोना वायरस बातम्या