IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र 

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे मुंबईत एकूण १० सामने होणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 09:32 AM2021-04-06T09:32:05+5:302021-04-06T09:33:05+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Some residents near the Wankhede Stadium request CM Uddhav Thackeray to shift IPL matches from the iconic venue | IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र 

IPL 2021 : वानखेडे स्टेडियमवरील सामने दुसरीकडे हलवा; स्थानिकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारनं पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. त्याशिवाय शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल आणि ३० एप्रिलपर्यंत ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पण, त्याचवेळी मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांना ( IPL 2021) परवानगी देण्यात आली आहे. पण, त्यांच्यासाठीही काही नियम आखून दिले आहेत. आता स्थानिकांनी वानखेडे स्टेडियमवरील सामने इतरत्र हलवावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

स्थानिकांचे म्हणणे काय?

  • स्टेडियम शेजारील इमारतींमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत आणि आयपीएलच्या सामन्याच्या वेळी होणारा आवाज व तीव्र लाईट्समुळे त्यांना त्रास होणार
  • स्टेडियम शेजारील अनेक इमारती कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सील केल्या आहेत.
  • सामना पाहाण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली नसली तरी खेळाडूंना पाहण्यासाठी स्टेडियमबाहेर लोकांची गर्दी वाढेल आणि त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते

 

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक काय म्हणाले?
नवाब मलिक म्हणाले,''नियमांचे पालन करूनच सामन्यांना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी असेल. आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला एकाच ठिकाणी आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. जास्त लोकं जमता कामा नयेत. या सर्व अटी मान्य केल्यानंतर आम्ही परवानगी दिली आहे.'' 

''अनेकांनी लसीकरणाची मागणी केली. बीसीसीआयनंही खेळाडूंना लस द्यावी अशी विनंती केली. पण, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आम्ही ते करू शकत नाही,''असे मलिक यांनी स्पष्ट केलं.

वानखेडे स्टेडियमवर होणारे सामने

१० एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
१२ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. पंजाब किंग्स
१५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स
१६ एप्रिल - पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स
१८ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स
१९ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
२१ एप्रिल - कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स
२२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स
२४ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
२५ एप्रिल - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
 

Web Title: IPL 2021 : Some residents near the Wankhede Stadium request CM Uddhav Thackeray to shift IPL matches from the iconic venue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.