Join us

IPL 2021: अहो, तुमच्याकडे पाणी येतंय का?; सूर्या बुमराहला वरून आवाssज देतो तेव्हा...

IPL 2021: सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा फोटो मुंबई इंडियन्सकडून ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 00:05 IST

Open in App

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानं मे महिन्यात आयपीएल स्पर्धा थांबवण्यात आली. या स्पर्धेचे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व संघांचे खेळाडू दुबईत येऊ लागले आहेत. मुंबईचा जेतेपदाच्या हॅट्रिकसाठी तयारीला लागला आहे. मुंबईच्या खेळांडूंनी सोशल मीडियावरदेखील हवा केली आहे.

मुंबई इंडियन्सचं ट्विटर हँडल कायम हटके ट्विटसाठी चर्चेत असतं. मुंबई इंडियन्सकडून ट्विट करण्यात आलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. या फोटोत सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी दिसत आहे. दोघेही हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीच्या गॅलरीत आहेत. त्या दोघांचा खालच्या मजल्यावर असलेल्या जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्याशी संवाद सुरू असल्याचं फोटोतून दिसत आहे. सूर्या बहुधा बुमराहला ''अहो! तुमच्या कडे पाणी येतंय का?", असं विचारत असावा, अशा भन्नाट शीर्षकासह मुंबई इंडियन्सनं हा फोटो ट्विट केला आहे.

मुंबई इंडियन्सची ट्विट कायम चर्चेत असतात. त्यामुळेच मुंबईची पलटण मैदानात गाजवत असताना मुंबईचे खेळाडू सोशल मीडियावरदेखील हवा करताना दिसतात. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सच्या अनेक ट्विट्स आणि पोस्टमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात येतो. गेल्या दोन आयपीएल जिंकणारा मुंबईचा संघ हॅट्रिकसाठी सज्ज झाला आहे. भारतात ७ सामने खेळून त्यातले ४ सामने जिंकणारा मुंबईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. या यादीत दिल्ली पहिल्या, चेन्नई दुसऱ्या, तर बंगळुरू तिसऱ्या स्थानी आहे.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सजसप्रित बुमराहसूर्यकुमार अशोक यादव
Open in App