Join us  

IPL 2021, MI vs RR, Live: मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकली, राजस्थान करणार फलंदाजी; रोहितनं आणला ऑस्ट्रेलियाचा घातक गोलंदाज

IPL 2021, MI vs RR, Live Update Score: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना होतोय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 2:59 PM

Open in App

IPL 2021, Mi vs RR, Live Updates Scorecard: आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात लढत होतेय. सामन्याची नाणेफेक जिंकून    संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात एकूण २४ लढती झाल्या आहेत. यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १२ सामने जिंकले आहेत. त्यामुळे लढत तुल्यबळ होणार एवढं नक्की आहे. IPL 2021, MI vs RR, Live Update Score

यंदाच्या सीझनमध्ये दोन्ही संघांची कामगिरी लौकिकाला साजेशी अशी होताना दिसत नाहीय. मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईच्या खेळपट्टीवर डगमगताना दिसला. संघानं पाच पैकी दोन सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ देखील पाच सामन्यांपैकी केवळ दोन सामने जिंकू शकला आहे. राजस्थानचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना अतिशय महत्वाचा ठरणार आहे. 

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पहिलाच सामना होतोय त्यामुळे चेन्नईच्या खेळपट्टीवर बॅकफूटवर गेलेला मुंबईचा संघ कमबॅक करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबई इंडियन्सनं आज संघात एक महत्वाचा बदल केला आहे. फलंदाज इशान किशन याला बाहेर बसवून संघात ऑस्ट्रेलियाच्या नेथन कुल्टर नाइल याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईनं आज एका अतिरिक्त गोलंदाजासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय. तर राजस्थान रॉयल्सकडून संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  

संघराजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, डेव्हिड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, मिस्तफिजुर रेहमान, चेतन साकरिया

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, जयंत यादव, नेथन कुल्टर नाइल, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सरोहित शर्मासंजू सॅमसन