Join us

IPL 2021, MI vs RR Live Updates : तो आला अन् हादवरून गेला; मुंबई इंडियन्सनं आज संधी दिलेल्या खेळाडूनं केली कमाल

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं दमदार खेळ केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 21:21 IST

Open in App

IPL 2021, Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Updates : प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी महत्त्वाच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं दमदार खेळ केला. मुंबईनं आज क्विंटन डी कॉकच्या जागी जिमी निशॅमला संधी दिली आणि त्यानं राजस्थान रॉयल्सची भंबेरी उडवली. निशॅमला नॅथन कोल्टर-नाइल, जसप्रीत बुमराह यांचीही उल्लेखनीय साथ मिळाली. राजस्थानला शतकी पल्लाही पार करता आला नाही.

 

मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सनं आजच्या सामन्यात दोन महत्त्वाचे व आश्चर्यकारक बदल केले आहेत. क्विंटन डी कॉकला बाकावर बसवून इशान किशनला संघात घेतले आहे, तर कृणाल पांड्याच्या जागी जिमी निशॅम खेळणार आहे. कृणाल पांड्याला ११ सामन्यांत फक्त पाच विकेट्स घेता आल्या आहेत. आयपीएलच्या कोणत्याही पर्वातील ही त्याची सर्वात खराब कामगिरी आहे. त्यानं ७.७४च्या इकॉनॉमीनं गोलंदाजी केली आहे. राजस्थान रॉयल्सनंही संघात दोन बदल केले आहेत.  श्रेयस गोपाळच्या जागी मयांक मार्कंडे, तर आकाश सिंगच्या जागी कुलदीप यादव खेळणार आहे.  

आतापर्यंत एव्हिन लुईस आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी धमाकेदार कामगिरी करत होती. पण, मुंबई इंडियन्सच्या अनुभवी गोलंदांनी त्यांना डोकं वर काढू दिलं नाही. पॉवर प्लेमध्ये लुईस व जैस्वाल यांना अनुक्रमे जसप्रीत बुमराह व नॅथन कोल्टर नाइल यांनी बाद केले. कर्णधार संजू सॅमसनही महत्त्वाच्या सामन्यात अपयशी ठरला. आज संधी मिळालेल्या जिमी निशॅमनं त्याला बाद केलं. मिशॅम इथेच थांबला नाही, तर मागील सामन्यात राजस्थानला विजय मिळवून देणाऱ्या शिवम दुबेचा अडथळाही दूर केला. ग्लेन फिलिप्सही विचित्र पद्धतीनं बाद झाल्यानं राजस्थानची अवस्था ५ बाद ५० अशी दयनीय झाली.डेव्हिड मिलर व राहुल टेवाटिया राजस्थानला सावरतील असे वाटत होते. पण, आज संधी मिळालेल्या निशॅमनं त्यांना जोरदार धक्के दिले. निशॅमनं ४ षटकांत १२ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. नॅथन कोल्टरनंही दमदार गोलंदाजी केली. मिलर १५ व टेवाटिया १२ धावांवर माघारी परतले. श्रेयस गोपाळ भोपळाही न फोडता माघारी गेला. नॅथननं १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. राजस्थानला ९ बाद ९० धावा करता आल्या.

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स
Open in App