Join us  

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : सलग ९व्या वर्षी मुंबई इंडियन्स मागचं 'ग्रहण' कायम, रोमहर्षक सामन्यात RCBचा विजय 

IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Mumbai Indians never won 1st game of IPL season since 2013 Indian Premier League 2021 : हर्षल पटेलच्या ( Harshal Patel) गोलंदाजीसमोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) फलंदाजांनी गुडघे टेकले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 11:26 PM

Open in App

Indian Premier League 2021 : हर्षल पटेलच्या ( Harshal Patel) गोलंदाजीसमोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) फलंदाजांनी गुडघे टेकले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून ( Royal Challengers Bangalore) एका सामन्याच पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध ( MI) अशी कामगिरी कोणालाच जमली नव्हती. RCBच्या गोलंदाजापाठोपाठ फलंदाजीत विराट कोहलीनं ( Virat Kohli) कमाल केली. ग्लेन मॅक्सवेलनंही सुरेख खेळ करताना फॉर्मात परतल्याचा ट्रेलर दाखवला. एबी डिव्हिलियर्स मॅच फिनिशर ठरला आणि त्याच्या तुफान फटकेबाजीनं RCBला विजय मिळवून दिला. तीन चेंडूंत तीन धावांची गरज असताना एबी धावबाद झाल्यानं सामना अधिक रंगतदार झाला. पाच विकेट्स घेणारा हर्षल अखेरच्या चेंडूवर विजयी धाव घेतली. RCBनं हा सामना २ विकेट्सनं जिंकला. २०१२नंतर मुंबई इंडियन्सला पहिला सामना कधीच जिंकता आलेला नाही आणि त्यांची मालिका सलग ९व्या वर्षीही कायम राहिली. IPL 2021 : MI vs RCB  T20 Live Score Update

हर्षल पटेलचा 'पंच'!रोहित शर्मा व ख्रिस लीन यांनी सावध सुरुवात केली, परंतु ताळमेळ चुकल्यानं मुंबईची महत्त्वाची विकेट पडली. सूर्यकुमार यादव आणि लीन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाची गाडी रुळावर आणली.  मुंबईला पहिल्या १० षटकांत १ बाद ८६ धावा करता आल्या. पण, अखेरच्या १० षटकांत त्यांचे ८ फलंदाज केवळ ८३ धावा करून माघारी परतले. हर्षलनं २७ धावांत पाच विकेट्स घेतल्या. RCBसाठी पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळे ( २००८) व जयदेव उनाडकट ( २०१३) यांनी हा पराक्रम केला होता. कायले जेमिन्सननं २७ धावांत १, वॉशिंग्टन सुंदरनं ७ धावांत १ विकेट घेतली. हर्षलनं २०व्या षटकात MIला चार धक्के दिले. त्यामुळे गतविजेत्यांना ९ बाद १५९ धावांवर समाधान मानावे लागले. MI vs RCB, MI Vs RCB live score विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, केला जगात एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम

विराट कोहलीनं खेळला मोठा डाव...देवदत्त पडीक्कलच्या अनुपस्थितीत कर्णधार विराट कोहलीसह सलामीला कोण येईल, याची सर्वांना उत्सुकता होती. मध्यप्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार ( Rajat Patidar) हा सलामीला येईल, हाच अंदाज सर्वांनी बांधला होता. पण, विराटनं लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन राखण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला ( Washington Sunder) सलामीला बढती दिली. त्याने सुरेख फटके मारून विराटचा निर्णय योग्य ठरवला. तो १० धावांवर कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सराव सामन्यात ४९ चेंडूंत शतक झळकावणारा रजत ८ धावांवर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. IPL 2021, IPL 2021 latest news

१०७९ दिवसानंतर  मॅक्सवेलचा पहिला षटकारत्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं चांगली साथ दिली. मॅक्सवेलनं १०७९ दिवसानंतर आयपीएलमध्ये पहिला षटकार खेचला. त्यानं २७ एप्रिल २०१८मध्ये आयपीएलमधील अखेरचा षटकार खेचला होता. १७१ चेंडू व १९ डावानंतर त्याचा हा पहिलाच षटकार ठरला.  टाईम आऊट ब्रेकमध्ये रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह यांनी चर्चा केली आणि पुढच्याच षटकात बुमराहनं RCBचा कर्णधार विराट कोहलीला पायचीत केलं. विराटनं २९ चेंडूंत ४ चौकारांसह ३३ धावा केल्या. आयपीएलमध्ये चौथ्यांदा जसप्रीतनं विराटची विकेट घेतली. MI vs RCB IPL Matches 

१५ व्या षटकात सामना फिरला, पण...RCBला अखेरच्या सहा षटकांत विजयासाठी ५७ धावांची गरज असताना २० वर्षीय गोलंदाज मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) यानं जोरदार धक्के दिले. त्यानं पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलचा अडथळा दूर केला. मॅक्सवेल २८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारासह ३९ धावांवर माघारी परतला. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जॅन्सेननं RCBच्या शाहबाद अहमद ( १) याला बाद केले. त्यामुळे RCBवरील दडपण वाढले. त्यानंतर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराहनं RCBला नाचवले.  MI vs RCB IPL match 2021, MI vs RCB T20 Match

एबी डिव्हिलियर्सनं सामन्यात चुरस कायम राखलीजसप्रीतनं टाकलेल्या १७व्या षटकात ५ धावा अन् १ विकेट गमावल्यानंतर एबी डिव्हिलियर्सनं १८व्या षटकात ट्रेंट बोल्टला टार्गेट केलं आणि १६ धावा चोपून काढल्या. अखेरच्या दोन षटकांत १९ धावा RCBला हव्या होत्या. जसप्रीतच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारून त्यानं आपला इरादा स्पष्ट केला. १९व्या षटकात १२ धावा जोडल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी ७ धावांची गरज होती. तीन चेंडूंत तीन धावा हव्या असताना एबी डिव्हिलियर्स धावबाद झाला. त्यानं २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारासह ४८ धावा केल्या. 

मुंबई इंडियन्सनं २०१२मध्ये आयपीएल पर्वातील पहिला सामना जिंकला होता२०१३ - पराभूत वि. बंगलोर२०१४ - पराभूत वि. कोलकाता२०१५ - पराभूत वि. कोलकाता२०१६ - पराभूत वि. पुणे२०१७ - पराभूत वि. पुणे२०१८ - पराभूत वि. चेन्नई२०१९ - पराभूत वि. दिल्ली२०२० - पराभूत वि. चेन्नई  

टॅग्स :आयपीएल ट्वेंटी-20 मॅच हायलाईट्समुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएबी डिव्हिलियर्स