IPL 2021 : MI vs RCB T20 Live : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, केला जगात एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम

IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai RCBच्या गोलंदाजापाठोपाठ फलंदाजीत विराट कोहलीनं ( Virat Kohli) कमाल केली. विराटनं मोठा विक्रम करताना आतापर्यंत कोणत्याच कर्णधाराला न जमलेला पराक्रम करून दाखवला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 10:20 PM2021-04-09T22:20:53+5:302021-04-09T22:21:30+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : 6000 T20 runs as captain for the King Virat Kohli, Most runs as a captain  | IPL 2021 : MI vs RCB T20 Live : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, केला जगात एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, केला जगात एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : हर्षल पटेलच्या ( Harshal Patel) गोलंदाजीसमोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) फलंदाजांनी गुडघे टेकले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून ( Royal Challengers Bangalore) एका सामन्याच पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध ( MI) अशी कामगिरी कोणालाच जमली नव्हती. RCBच्या गोलंदाजापाठोपाठ फलंदाजीत विराट कोहलीनं ( Virat Kohli) कमाल केली. विराटनं मोठा विक्रम करताना आतापर्यंत कोणत्याच कर्णधाराला न जमलेला पराक्रम करून दाखवला.  Mi vs RCB Live Score Updates

रोहित शर्मा व ख्रिस लीन यांनी सावध सुरुवात केली, परंतु ताळमेळ चुकल्यानं मुंबईची महत्त्वाची विकेट पडली. आयपीएलमध्ये MIकडून पदार्पण करणारा लीन RCBच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना पाहायला मिळाला. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर ख्रिस लीननं फटका मारला आणि रोहितनं धाव घेण्यासाठी मैदान सोडलं. विराट कोहली चेंडूजवळ पोहोचतोय असे दिसताच लीननं रोहितला माघारी जाण्यास सांगितले आणि तोपर्यंत विराटनं चेंडू यष्टींजवळ उभ्या असलेल्या चहलकडे सोपवला. सूर्यकुमार यादव आणि लीन यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाची गाडी रुळावर आणली. IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update बाबो!, १५ कोटींच्या कायले जेमिन्सनच्या वेगानं कृणाल पांड्याच्या बॅटीचे दोन तुकडे, Video

मुंबईला पहिल्या १० षटकांत १ बाद ८६ धावा करता आल्या. पण, अखेरच्या १० षटकांत त्यांचे ८ फलंदाज केवळ ८३ धावा करून माघारी परतले. हर्षलनं २७ धावांत पाच विकेट्स घेतल्या. RCBसाठी पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी अनिल कुंबळे ( २००८) व जयदेव उनाडकट ( २०१३) यांनी हा पराक्रम केला होता. कायले जेमिन्सननं २७ धावांत १, वॉशिंग्टन सुंदरनं ७ धावांत १ विकेट घेतली. हर्षलनं २०व्या षटकात MIला चार धक्के दिले. त्यामुळे गतविजेत्यांना ९ बाद १५९ धावांवर समाधान मानावे लागले. काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला

विराट कोहलीनं खेळला मोठा डाव...
देवदत्त पडीक्कलच्या अनुपस्थितीत कर्णधार विराट कोहलीसह सलामीला कोण येईल, याची सर्वांना उत्सुकता होती. मध्यप्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार ( Rajat Patidar) हा सलामीला येईल, हाच अंदाज सर्वांनी बांधला होता. पण, विराटनं लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन राखण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला ( Washington Sunder) सलामीला बढती दिली. त्याने सुरेख फटके मारून विराटचा निर्णय योग्य ठरवला. तो १० धावांवर कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सराव सामन्यात ४९ चेंडूंत शतक झळकावणारा रजत ८ धावांवर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.  रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार? IPL 2021, IPL 2021 latest news, MI vs RCB IPL Matches

ट्वेंटी-२०त सहा हजार धावा करणारा पहिला कर्णधार
विराट कोहली - १६८ सामने - ६०००* धावा
महेंद्रसिंग धोनी - २५२ सामने - ५८७२ धावा
गौतम गंभीर - १६६ सामने - ४२४२ धावा
अॅरोन फिंच - १२६ सामने - ४०५१ धावा
रोहित शर्मा - १४० सामने - ३९२९ धावा
 

Web Title: IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : 6000 T20 runs as captain for the King Virat Kohli, Most runs as a captain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.