IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?

Indian Premier League 2021 : सुरुवातीला गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 07:57 PM2021-04-09T19:57:41+5:302021-04-09T20:09:44+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Sharp bit of fielding from the RCB Skipper and Rohit Sharma is run out for 19 | IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?

IPL 2021 : MI vs RCB T20 Live : रोहित शर्माला खेळपट्टीच्या मधोमध बोलवून माघारी पाठवलं अन् MIला बसला धक्का; पदार्पणवीराची चूक महागात पडणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2021 : सुरुवातीला गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीनं ( Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Mumbai Indians Captain Rohit Sharma) यालाही प्रथम क्षेत्ररक्षण करायचे होते. पण, नाणेफेकीचा कौल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( Royal Challengers Bangalore) बाजूनं लागला. मुंबई इंडियन्सकडून दोन, तर RCBकडून तीन खेळाडूंनी आजच्या सामन्यात पदार्पण केलं.विराट कोहलीच्या संघात ग्लेन मॅस्कवेल, कायले जेमिन्सन, डॅनिएल ख्रिस्टीन व रजत पाटीदार हे नवे चेहरे दिसणार आहेत, तर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात ख्रिस लीन व मार्को जॅन्सेन पदार्पण करत आहेत.  IPL 2021 : MI vs RCB T20 Live Score Update 

८ वर्षानंतर मैदानावर उतरला RCBचा कोहिनूर
२०१३ला आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या डॅनिएल ख्रिस्टीन यानं ८ वर्षानंतर पुनरागमन केलं आहे. ख्रिस्टीननं आयपीमध्ये ४० सामन्यांत ४४६ धावा केल्या आहेत आणि शिवाय ३४ विकेट्सही घेतल्या आहेत. २०११, २०१२, २०१३, २०१७ आणि २०१८ या पर्वातही ख्रिस्टीन खेळला होता.  Mi vs RCB Live Score Updates मुंबई इंडियन्सच्या ६ फुट ८ इंचाच्या गोलंदाजासमोर विराट कोहलीची उडाली होती भंबेरी, आज करतोय पदार्पण

ख्रिस लीन व मार्को जॅन्सेन यांना पदार्पणाची संधी
मागच्या पर्वात बाकावर बसलेल्या ख्रिस लीनला यंदा पदार्पणाची संधी मिळाली आहे, क्विंटन डी कॉकच्या अनुपस्थितील तो आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणार आहे, रोहित शर्मासोबत तो सलामीला येईल. ख्रिस लीननं २१० ट्वेंटी-२० सामन्यांत २ शतकं व ३९ अर्धशतकांसह ५७२६ धावा केल्या आहेत. शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या २० वर्षीय मार्को जॅन्सेन यालाही पदार्पणाची कॅप दिली आहे. जॅन्सेन हा डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. त्यानं १० ट्वेंटी-२० सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या आहेत. MI vs RCB, MI Vs RCB live score, IPL 2021, IPL 2021 latest news  मुंबई इंडियन्सची 'मराठी'वरील माया आटली?; मराठी एकीकरण समितीनं विचारला जाब, नव्या वादाला सुरुवात! 

रोहितची विकेट आयती भेटली!
रोहित शर्मा व ख्रिस लीन यांनी सावध सुरुवात केली, परंतु ताळमेळ चुकल्यानं मुंबईची महत्त्वाची विकेट पडली. आयपीएलमध्ये MIकडून पदार्पण करणारा लीन RCBच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना पाहायला मिळाला. रोहितनं या सामन्यात पहिला चौकार व पहिला षटकार मारण्याचा मान पटकावला. १००वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर रोहितनं षटकार खेचला. चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लीननं फटका मारला आणि रोहितनं धाव घेण्यासाठी मैदान सोडलं. विराट कोहली चेंडूजवळ पोहोचतोय असे दिसताच लीननं रोहितला माघारी जाण्यास सांगितले आणि तोपर्यंत विराटनं चेंडू यष्टींजवळ उभ्या असलेल्या चहलकडे सोपवला. IPL 2021, IPL 2021 latest news, MI vs RCB IPL Matches

आयपीएलमध्ये रोहित शर्मा ३६ वेळा धावबाद झाला आहे. यापैकी ११वेळा तो स्वतःच्या चुकीनं, तर २५ वेळा सहकाऱ्याच्या चुकीनं तंबूत परतला. आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा धावबाद होण्याचा नकोसा विक्रम रोहितच्या नावावर आहे.
 

Web Title: IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score : Sharp bit of fielding from the RCB Skipper and Rohit Sharma is run out for 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.