IPL 2021, Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या ( RCB) १६५ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली होती. १०व्या षटकापर्यंत मुंबईचा संग आघाडीवर होता, परंतु ग्लेन मॅक्सवेलनं टाकलेल्या १०व्या षटकात मोठा धक्का बसला. रोहित झेलबाद झाला अन् MIचा डाव गडगडला. बाद होण्यापूर्वी रोहितच्या हातावर जबरदस्त फटका बसला होता आणि इशान किशनमुळे तो जखमी झाला होता. त्या प्रसंगानंतर तिसऱ्याच चेंडूवर रोहित बाद झाला.
IPL 2021, MI vs RCB Match Highlights : त्या पाच षटकांनी घात केला, फ्रंटसिटवर बसलेला मुंबई इंडियन्सचा संघ बॅकसिटवर फेकला गेला
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली ( ५१) व ग्लेन मॅक्सवेल ( ५६) यांनी अर्धशतक झळकावली. श्रीसक भरतनेही ३२ धावांचे योगदान देताना RCBला ६ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारून दिली. जसप्रीत बुमराहनं ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्मा ( ४३) व क्विंटन डी कॉक ( २४) यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावा जोडल्या, परंतु हे दोघंही माघारी परतताच मुंबईचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. कृणाल पांड्या, इशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव व किरॉन पोलार्ड हे एकेरी धावसंख्येवरच माघारी परतले. हर्षल पटेलनं हॅटट्रिकसह १७ धावांत ४ विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहलनं ११ धावांत ३, तर ग्लेन मॅक्सवेलनं २३ धावांत २ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सचा डाव १८.१ षटकांत १११ धावांवर गडगडला.
रोहितची पत्नी रितिका समोर बसलीय, परंतु चर्चा मागे उभ्या असलेल्या सुंदरीची, कोण आहे ती?
त्या षटकात नेमकं काय घडलं?
ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर इशान किशननं मारलेला फटका नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या दिशेनं गेला. अंगावर वेगानं येणारा चेंडू अडवण्यासाठी रोहितनं डावा हात पुढे केला अन् चेंडूचा मार हातावर झेलला. त्यानंतर रोहित वेदनेनं कळवळला.. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रोहित बाद होऊन माघारी परतला. रोहितची ही दुखापत गंभीर नसावी अशीच प्रार्थना चाहते करत आहेत.