Join us  

IPL 2021, MI vs RCB : विराट कोहलीच्या एका निर्णयावर युवराज सिंग तीव्र नाराज, सामन्यानंतर विचारला थेट सवाल

Indian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 7:45 AM

Open in App

Indian Premier League 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं आयपीएल २०२१ची सुरूवात विजयानं केली. २०१२नंतर मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएलच्या पर्वातील पहिला सामना जिंकण्यात अपयश आलं. मुंबईनं ( MI) विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना RCBचाही घाम निघाला, परंतु एबी डिव्हिलियर्सनं ( AB de Villiers) मॅच विनिंग खेळी केली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात पाच विकेट्स घेणाऱ्या हर्षल पटेलनं ( Harshal Patel) RCBची विजयी धाव घेतली. विराट कोहलीच्या संघानं ( Virat Kohli) हा सामना २ विकेट्सनं जिंकला. पण, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगन ( Yuvraj Singh) यानं विराटच्या एका निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सामन्यानंतर त्यानं सोशल मीडियावर जाहीरपणे ती बोलूनही दाखवली. IPL 2021 1st t20 mi vs rcb live match score updates chennai सलग ९व्या वर्षी मुंबई इंडियन्स मागचं 'ग्रहण' कायम, रोमहर्षक सामन्यात RCBचा विजय 

नाणेफेक जिंकून विराटनं मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुर्दैवीरित्या धावबाद होऊन १९ धावांवर माघारी परतला. MI कडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या ख्रिस लीन ( ४९), सूर्यकुमार यादव ( ३१), इशान किशन ( २८) यांनी छोटेखानी योगदान देताना मुंबईला ९ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारून दिली. हर्षल पटेलनं २०व्या षटकात चार धक्के दिले. यापैकी एक धावबाद होता. हर्षलनं २७ धावांत ५ विकेट्स घेतल्या. मुंबई इंडियन्सविरुद्ध पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. RCBकडून अनिल कुंबळे व जयदेव उनाडकट यांच्यानंतर अशी कामगिरी करणार हर्षल तिसरा गोलंदाज ठरला. कायले जेमिन्सन व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.IPL 2021 : MI vs RCB  T20 Live Score Update  विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम, केला जगात एकाही कर्णधाराला न जमलेला पराक्रम

लक्ष्याचा पाठलाग करताना, विराट कोहली व वॉशिंग्टन सुंदर सलामीला आले, परंत सुंदर लगेच माघारी परतला. पदार्पणवीर रजत पाटीदारही फार कमाल करू शकला नाही. विराट कोहली ( ३३)  व ग्लेन मॅक्सवेल ( ३९) यांनी अर्धशतकी भागीदारी करताना सामन्यात कमबॅक केले. पण, ही दोघंही माघारी परतल्यानंतर एबी डिव्हिलियर्सवर जबाबदारी आली. त्यानं २७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा करताना सामना चुरशीचा बनवला. तीन चेंडूंत तीन धावांची गरज असताना दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात एबी धावबाद झाला. पण, हर्षल व मोहम्मद सिराजनं २ चेंडूंत २ धाव घेत RCB चा विजय पक्का केला.IPL 2021 Mi vs RCB Live T20 Score  काळजाचा ठोका चुकला, विराट कोहलीच्या डोळ्याच्या खाली चेंडूचा फटका बसला, Video

युवराज सिंग का नाराज झाला?विराट कोहलीनं संघातील प्रमुख खेळाडू एबी डिव्हिलियर्सला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाचारण केलं. वॉशिंग्टन व रजत यांना त्याच्याआधी संधी दिली. सामना सुरू असताना RCBचे चाहते विराटच्या या निर्णयावर नाराज दिसले. युवीलाही हा निर्णय पटला नाही आणि त्यानं सामन्यानंतर ट्विट केलं. तो म्हणाला,''एबी डिव्हिलियर्सला पाचव्या क्रमांकावर का खेळवलं, हे समजलं नाही. तुमच्या संघातील सर्वोत्तम फलंदाज एक तर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर खेळायला हवा. हे मी माझं मत व्यक्त केलंय. 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीएबी डिव्हिलियर्सयुवराज सिंग