Join us  

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी पुन्हा निराश केले, पंजाबच्या नव्या खेळाडूनं मोठे धक्के दिले 

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सलामीवीर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्यामुळे पुढील सामन्यात ख्रिस लीनला खेळवण्याची मागणी होणे रास्त आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 9:13 PM

Open in App

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) सलामीवीर क्विंटन डी कॉक पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्यामुळे पुढील सामन्यात ख्रिस लीनला खेळवण्याची मागणी होणे रास्त आहे. मागील पर्वात धावा कुटणाऱ्या इशान किशनची बॅट यंदा रुसलेली दिसतेय. त्यामुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्यावरील दडपण वाढलेले दिसले आणि त्यातही त्यानं दमदार कामगिरी करताना पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध समाधानकारक पल्ला गाठून दिला. सूर्यानंही त्याला साजेशी साथ दिली. रवी बिश्नोईला खेळवण्याचा PBKSचा डाव यशस्वी ठरला. त्यानं ४ षटकांत २१ धावांत २ विकेट्स घेतल्या.  IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live Score Update

पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि इशान किशन यांनी अपयशाचा पाढा याही सामन्यात गिरवला अन् त्यांना तंबूत जाताना पाहून रोहित शर्मा ( Rohit Sharma) निराश दिसला. पण, तो खेळपट्टीवर तग धरून होता, त्यानं संयमी खेळ केला. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून १५०० धावाही पूर्ण केल्या. लोकेशनं दुसऱ्याच षटकात चेंडू दीपक हुडाच्या हाती सोपवला अन् त्यानं MIच्या क्विंटनला ( ३) बाद करताना पहिला धक्का दिला. ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai रोहित शर्मा चूकला, पण IPLमध्ये मोठा पराक्रम केला; सलामीवीर म्हणूनही हिट ठरला!

मुंबईला पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद २१ धावा करता आल्या. रवी बिश्नोईनं आजच्या सामन्यासाठी त्याची केलेली निवड सार्थ ठरवली. सातव्या षटकात बिश्नोईच्या फिरकी घेणाऱ्या चेंडूवर लेट कट मारण्याच्या प्रयत्नात इशान किशन झेलबाद झाला. लोकेशनं अप्रतिम झेल टिपला. बिश्नोई व फॅबियन अॅलेन यांच्या फिरकीचा सामना करताना MIचे फलंदाज चाचपडत होते. रोहित व सूर्यकुमार यादव या जोडीनं खेळपट्टीवर सेट होताच फटकेबाजीला सुरुवात केली. या दोघांनी ३७ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रोहितनं ४० चेंडूंत त्याचे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं. MIनं १५ षटकांत २ बाद ९७ धावा केल्या होत्या. MI Vs PBKS, MI Vs PBKS live score, IPL 2021 रोहित शर्मा पहिल्याच षटकात भडकला, २००व्या डावात नको ते करून बसला, Video 

१७ व्या षटकात बिश्नोईनं ही भागीदारी तोडली. बिश्नोईच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सूर्या ३३ ( २७ चेंडूं, ३ चौकार व १ षटकार) धावांवर माघारी परतला. रोहितसह त्यानं तिसऱ्या विकेटसाठी ५६ चेंडूंत ७९ धावांची भागीदारी केली. १८व्या षटकात मोहम्मद शमीनं MIला मोठा धक्का देताना, रोहित शर्माला ६३( ५२ चेंडू, ५ चौकार व २ षटकार) धावांवर माघारी पाठवले. फॅबियन अॅलननं सीमारेषेनजीक त्याचा सुरेख झेल टिपला. मुंबईला २० षटकांत ६ बाद १३१ धावांवर समाधान मानावे लागले. MI Vs PBKS Live Score, IPL 2021 MI Vs PBKS, MI Vs PBKS Live Match

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सपंजाब किंग्सरोहित शर्मा