IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : रोहित शर्मा चूकला, पण IPLमध्ये मोठा पराक्रम केला; सलामीवीर म्हणूनही हिट ठरला!

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 08:19 PM2021-04-23T20:19:12+5:302021-04-23T20:20:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Rohit Sharma completes 1500 runs as Opener in IPL, he is 1st Batsman to play 200 innings in IPL | IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : रोहित शर्मा चूकला, पण IPLमध्ये मोठा पराक्रम केला; सलामीवीर म्हणूनही हिट ठरला!

IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live : रोहित शर्मा चूकला, पण IPLमध्ये मोठा पराक्रम केला; सलामीवीर म्हणूनही हिट ठरला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ipl 2021  t20 MI Vs PBKS live match score updates Chennai : पंजाब किंग्सचा ( Punjab Kings) कर्णधार लोकेश राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी कॉक आणि इशान किशन यांनी अपयशाचा पाढा याही सामन्यात गिरवला अन् त्यांना तंबूत जाताना पाहून रोहित शर्मा ( Rohit Sharma) निराश दिसला. पण, तो खेळपट्टीवर तग धरून होता, त्यानं संयमी खेळ करताना MIला पहिल्या दहा षटकांत २ बाद ४९ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्यानं आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून १५०० धावाही पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक ५००० धावांचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे.  IPL 2021 : MI Vs PBKS T20 Live Score Update

रोहित शर्मानं ( Rohit Sharma) संघात कोणताच बदल न करता क्विंटन डी कॉकसह सलामीला आला. मोईजेस हेन्रीक्सच्या पहिल्या षटकात मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) कर्णधार रोहितसाठी अपील झाली अन् अम्पायर शमसुद्दीन यांनी त्याला बाद दिले. अम्पायरच्या या निर्णयावर रोहितनं नाराजी व्यक्त करताना त्यांच्याकडे हातवारे करून रागात काहीतरी पुटपुटला. त्याच्यावर सामनाधिकारी कोणती कारवाई करतील, हे सामन्यानंतरच कळेल. रोहित शर्मा पहिल्याच षटकात भडकला, २००व्या डावात नको ते करून बसला, Video 

रोहित शर्मा आज आयपीएलमधील २००वी इनिंग खेळत आहे आणि असा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. ( Most innings batted in IPL) त्यानंतर सुरेश रैना ( १९२), विराट कोहली ( १८८), महेंद्रसिंग धोनी ( १८५) व रॉबीन उथप्पा ( १८२) यांचा क्रमांक येतो. हेन्रीक्सनं टाकलेला चेंडू लेगसाईडला रोहितच्या थायपॅडला आदळून यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेपावला, अम्पायरनं रोहितला बाद दिले आणि त्यानं लगेच DRS घेतला. त्यात तो नाबाद असल्याचे स्पष्ट झाले. लोकेशनं दुसऱ्याच षटकात चेंडू दीपक हुडाच्या हाती सोपवला अन् त्यानं MIच्या क्विंटनला ( ३) बाद करताना पहिला धक्का दिला. MI Vs PBKS, MI Vs PBKS live score, IPL 2021, IPL 2021 latest news,

मुंबईला पहिल्या पॉवर प्लेमध्ये १ बाद २१ धावा करता आल्या. रवी बिश्नोईनं आजच्या सामन्यासाठी त्याची केलेली निवड सार्थ ठरवली. सातव्या षटकात बिश्नोईच्या फिरकी घेणाऱ्या चेंडूवर लेट कट मारण्याच्या प्रयत्नात इशान किशन झेलबाद झाला. लोकेशनं अप्रतिम झेल टिपला. बिश्नोई व फॅबियन अॅलेन यांच्या फिरकीचा सामना करताना MIचे फलंदाज चाचपडत होते. IPL 2021 MI Vs PBKS, MI Vs PBKS Live Match

Web Title: IPL 2021 MI Vs PBKS Live T20 Score : Rohit Sharma completes 1500 runs as Opener in IPL, he is 1st Batsman to play 200 innings in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.