Join us  

IPL 2021 : MI Vs KKR T20 Live : WHAT A SHOT!; सूर्याकुमार यादवचा उत्तुंग षटकार, हार्दिक पांड्या झाला स्तब्ध, Video 

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : क्विंटन डी कॉक दोन धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 8:25 PM

Open in App

IPL 2021 : MI Vs KKR  T20 Live Score Update : क्विंटन डी कॉक दोन धावांवर माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५३ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. सूर्यानं ३६ चेंडूंत ७ चौकार  व २ षटकारांसह ५६ धावा चोपल्या. त्यानं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी चेपॉकवर ९९ मीटर उत्तुंग षटकार खेचला आणि तो पाहून डगआऊटमध्ये उभा असलेला हार्दिक पांड्या स्तब्ध झाला.  IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update KKRनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या ताफ्यात एकही बदल केलेला नाही, तर मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक परतला आहे आणि त्यामुळे मागच्या सामन्यात ४९ धावा करणाऱ्या ख्रिस लीनला बाकावर बसावे लागले. पण, क्विंटनला ( २) फार कमाल दाखवता आली नाही. वरूण चक्रवर्थीनं दुसऱ्याच षटकात त्याला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) जराही दडपण न घेता आक्रमक खेळ केला. हरभजन सिंगच्या एका षटकात त्यानं तीन खणखणीत चौकार खेचले आणि संघावरील दडपण कमी केलं. KKRचा कर्णधार इयॉन मॉर्गननं पहिल्या पॉवर प्लेमध्ये त्याच्या तीनही प्रमुख फिरकी गोलंदाजांना पाचारण केलं. ipl 2021 t20 MI Vs KKR live match score updates chennai

या सामन्यात रोहितनं १६वी धाव घेताच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान पटकावले. त्यानं SRHच्या डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाजांत विराट कोहली - ५९११, सुरेश रैना  -५४२२, शिखर धवन - ५२८२, रोहित शर्मा - ५२६५* व डेव्हिड वॉर्नर - ५२५७ असे अव्वल पाच खेळाडू आहेत. रोहित थोडासा संथ खेळत होता, तेच दुसरीकडे सूर्याची बॅट तुफान फटकेबाजी करत होता. रोहित-सूर्या जोडीनं ३८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १०व्या षटकात पॅट कमिन्सच्या पाचव्या चेंडूवर सूर्यानं मारलेला षटकार स्टेडियमपार केला. सूर्यानं या षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याचा ९९ मीटरचा हा फटका पाहून डगआऊटमध्ये बसलेला हार्दिक पाड्याही अवाक् झाला.  IPL 2021 : MI Vs KKR T20 Live Score Update

टॅग्स :आयपीएल २०२१सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सहार्दिक पांड्या