Join us

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सचं कोलकातासमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान; डी'कॉकची अर्धशतकी खेळी

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 21:31 IST

Open in App

IPL 2021, MI vs KKR, Live: मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी १५६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सची सुरुवात दमदार झाली होती पण अखेरच्या षटकांमध्ये केकेआरनं मुंबईचा धावसंख्येला लगाम घातला. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर क्विंटन डीकॉकनं ४२ चेंडूत ५५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. यात ३ उत्तुंग षटकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे. 

'ऋषभ पंतला भारतीय संघातून बाहेर काढायचं असेल तर...', रिकी पाँटिंगनं केली मोठी भविष्यवाणी

रोहित शर्मानंही चांगली साथ देत ३० चेंडूत ३३ धावांची खेळी साकारली. मुंबई इंडियन्सची दमदार सुरुवात पाहता संघाची धावसंख्या सहजपणे १८० धावांचा आकडा गाठेल अशी परिस्थिती होती. पण अखेरच्या षटकांमध्ये मुंबईचे फलंदाज एकामागोमाग एक तंबूत दाखल झाले आणि मुंबईला १५५ धावांवर समाधान मानावं लागलं आहे. 

सनरायझर्स हैदराबादच्या अष्टपैलू खेळाडूनं घेतला 'बायो-बबल' सोडण्याचा निर्णय, मायदेशी रवाना होणार

पहिल्या १० षटकांमध्ये मुंबईनं ८० धावांचा टप्पा ओलांडला होता. सुर्यकुमार यादव (५) यावेळी मोठी खेळी साकारण्यात अपयश ठरला. तर इशान किशन देखील मोठा फटका मारण्याच नादात १४ धावा करुन माघारी परतला. कायरन पोलार्डनं अखेरच्या षटकांमध्ये धावसंख्येला गती देण्याचा प्रयत्न केला खरा पण आज त्याला एकच षटकार ठोकला आला. पोलार्डनं २१ धावा केल्या. कृणाल पंड्या १२ धावा करुन बाद झाला. केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर सुनील नरेननं रोहित शर्माची महत्त्वाची विकेट घेतली. 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सरोहित शर्माक्विन्टन डि कॉक
Open in App