Join us

IPL 2021, MI vs DC Live Updates : What a ball, आवेश खाननं १४१kmphच्या वेगानं फेकलेल्या चेंडूवर हार्दिक पांड्याचा उडाला त्रिफळा, Video 

रोहित शर्मा ( ७), क्विंटन डी कॉक ( १९), सौरभ तिवारी ( १५), किरॉन पोलार्ड ( ६) हे अपयशी ठरले. सूर्यकुमारला आज मोठी खेळी करून टीकाकारांची तोंड बंद करण्याची संधी होती पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 17:40 IST

Open in App

 IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : मुंबई इंडियन्सच्या ( MI) तगड्या फलंदाजांची आज दिल्ली कॅपिटल्सच्या ( DC) गोलंदाजांसमोर दैना उडाली.  अक्षर पटेल व आवेश खान यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत मुंबईला १२९ धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. आवेशनं टाकलेल्या भन्नाट यॉर्करवर तर हार्दिक पांड्या अडखळला अन् काहीच समजण्यापूर्वी चेंडूनं यष्टींचा वेध घेतला...  

रोहित शर्मा ( ७), क्विंटन डी कॉक ( १९), सौरभ तिवारी ( १५), किरॉन पोलार्ड ( ६) हे अपयशी ठरले. सूर्यकुमारला आज मोठी खेळी करून टीकाकारांची तोंड बंद करण्याची संधी होती. त्यानं काही सुरेख फटके मारून त्या दिशेनं सुरुवातही केली, परंतु अक्षरच्या फुल्टॉसवर तो रबाडाच्या हाती झेल देऊन परतला. त्यानं २६ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ३३ धावा केल्या. १५व्या षटकात किरॉन पोलार्ड दुर्दैवीरित्या बाद झाला. 

अॅनरिच नॉर्ट्झेनं टाकलेल्या संथ चेंडूवर पोलार्डची बॅट आधीच फिरकी अन् चेंडू बॅटची किनार घेत यष्टींवर आदळला. अक्षर पटेलनं ४ षटकांत २१ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. कृणाल व हार्दिक ही पांड्या ब्रदर्स जोडीही काहीच कमाल करू शकली नाही. आवेश खानच्या अप्रतमि यॉर्कनं हार्दिकचा ( १७) त्रिफळा उडवला. आवेश खाननं १५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. 

पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :आयपीएल २०२१हार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App