Join us

IPL 2021, MI vs DC Live Updates : मुंबईचं आव्हान परतवून लावण्यासाठी दिल्लीनं उतरवला 'मुंबईकर'; दोन्ही संघांत महत्वाचे बदल

IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : एक संघ प्ले ऑफच्या उंबरठ्यात अन् दुसऱ्याला आता पत्येक सामना जिंकणं आहे गरजेचं...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:08 IST

Open in App

IPL 2021, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Updates : एक संघ प्ले ऑफच्या उंबरठ्यात अन् दुसऱ्याला आता पत्येक सामना जिंकणं आहे गरजेचं...  दिल्ली कॅपिटल्स ( DC) आणि मुंबई इंडियन्स ( MI) यांच्यातला हा सामना किती कट्टर असेल, याचा विचार करा... दिल्लीनं १६ गुणांसह प्ले ऑफचा उंबरठा जवळपास ओलांडलाच आहे आणि आज विजय मिळवून ते चेन्नई सुपर किंग्सनंतर ( CSK) प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या दुसऱ्या संघाचा मान पटकावतील. दुसरीकडे जेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईला प्ले ऑफसाठी संघर्ष करावा लागत आहे. मुंबईला ११ सामन्यांत फक्त १० गुण जमवता आले आहेत आणि त्यांना उर्वरित तिन्ही सामने जिंकावेच लागतील.

अनुभवी रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा फ्युचर कर्णधार रिषभ पंत यांच्यातली चुरस पाहायला नक्की आवडेल. मुंबई व दिल्ली यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्या रोहितच्या टीमचे पारडे १६-१३ ( जय-पराजय) असे जड आहे. पण, दिल्लीचा संघ चांगल्या फॉर्मात आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ दिल्लीच्या संघात परतला असून मुंबईनं राहुल चहरच्या जागी जयंत यादवला उतरवले आहे. दिल्ली कॅपिटल्स -  शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, स्टीव्ह स्मिथ, अक्षर पटेल, आर अश्विन, आवेश खान, कागिसो रबाडा, अॅनरिच नॉर्ट्जे, हेत्ती

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स
Open in App