IPL 2021, MI vs CSK Live: मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी

IPL 2021, MI vs CSK Live: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज रविवारी होणाऱ्या धडाकेबाज आणि तुल्यबळ सामन्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:08 PM2021-09-19T19:08:40+5:302021-09-19T19:09:18+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 MI vs CSK Live Rohit sharma not playing first match Pollard captain chennai wins toss select batting | IPL 2021, MI vs CSK Live: मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी

IPL 2021, MI vs CSK Live: मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, MI vs CSK Live: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज रविवारी होणाऱ्या धडाकेबाज आणि तुल्यबळ सामन्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. चेन्नई सुपरकिंग्जनं सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सर्वात मोठी अपडेट म्हणजे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माकडे नसून कायरन पोलार्डकडे संघाची धुरा देण्यात आली आहे. 

ख्रिस गेल IPL खेळणार नाही? पाकिस्तानात जाण्याची घोषणा केल्यानं चर्चांना उधाण!

रोहित शर्मा आजच्या सामना खेळणार नसल्यानं कायरन पोलार्ड संघाचं नेतृत्त्व करत आहे. दरम्यान, रोहितला संघाबाहेर बसविण्याचं नेमकं कारण अद्याप देण्यात आलेलं नाही. पोलार्डनं फक्त आजचा सामना मी नेतृत्त्व करत असल्याचं नाणेफेकीवेळी सांगितलं आहे. रोहितच्या प्रकृतीबाबत त्यानंही अधिक माहिती दिलेली नाही. रोहित शर्मासोबतच मुंबईचा धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंड्या देखील आजचा सामना खेळणार नसल्याचं पोलार्डनं सांगितलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला आज सुरुवातीच्याच सामन्यात दोन धक्के बसले आहेत. 

मुंबईने ७ पैकी ४ तर चेन्नईने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. मागच्या सत्रात दारुण कामगिरी करणाऱ्या चेन्नईला ऋतुराज गायकवाड,इम्रान ताहिर, मोईन अली रवींद्र जडेजा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना हे देखील फॉर्ममध्ये परतण्याची आशा आहे. 

सचिन दुबईच्या मैदानात-
महान फलंदाज सचिन तेंडुलकर यूएईत दाखल झाला. तो मुंबई इंडियन्स पथकाचा मेंटॉर आहे. याशिवाय संघाला मार्गदर्शन तसेच सपोर्ट स्टाफला सहकार्य करतो.सचिनची उपस्थिती खेळाडूंसाठी मनोबल उंचावणारी ठरते. विशेष म्हणजे त्याला मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील याच संघातून खेळतो.पाच दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर शनिवारी सचिनने दुबई स्टेडियमला भेट दिली.

Web Title: IPL 2021 MI vs CSK Live Rohit sharma not playing first match Pollard captain chennai wins toss select batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.