Join us  

IPL 2021, MI vs CSK, Live: चेन्नई एक्स्प्रेस सुस्साट! रायुडूनं सॉलिड धुतलं; मुंबईसमोर उभारला २१८ धावांचा डोंगर 

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलमध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबईच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 9:18 PM

Open in App

IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलमध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबईच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला आहे. चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबईसमोर विजयासाठी २१९ धावांचं आव्हान दिलं आहे. वीस षटकांच्या अखेरीस चेन्नईनं ४ बाद २१८ धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडू यानं अखेरच्या षटकांत तुफान फटकोबाजी करत संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. रायुडूनं अवघ्या २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. तर फॅफ ड्यू प्लेसिसनं २८ चेंडूत ५० धावा, तर मोइन अलीनं ३६ चेंडूत ५८ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. (IPL 2021 MI vs CSK Live Chennai super kings sets  run targer against mumbai indians)

मुंबई इंडियन्सला सामन्याच्या सुरुवातीलाच ऋतूराज गायकवाडच्या रुपात पहिलं यश मिळालं होतं. गायकवाड अवघ्या ४ धावा करुन माघारी परतला होता. पण त्यानंतर ड्यू प्लेसिस आणि मोइन अली यांनी शतकी भागीदारी रचून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची पिसं काढली. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ड, धवल कुलकर्णी यांसारखे संघाचे मुख्य गोलंदाज तुफान मार खात असताना कायरन पोलार्डनं एकाच षटकात फॅफ ड्यू प्लेसिस आणि सुरेश रैना यांना बाद केलं. पण अंबाती रायुडूनं येऊन तुफान फटकेबाजी करत सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण केली. रायुडूनं अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर सामन्याच्या अखेरीस रायुडू २७ चेंडूत ७२ धावा करुन नाबाद राहिला. रायुडूनं ७ उत्तुंग षटकार आणि चार चौकार लगावले. 

इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५६ धावा दिल्या. तर जिमी निशमच्या दोन षटकांमध्ये २६ धावा कुटल्या गेल्या. ट्रेंट बोल्टनं ४ षटकांमध्ये एक विकेट घेत ४२ धावा दिल्या. आजच्या सामन्यात संधी देण्यात आलेल्या धवल कुलकर्णी यानं चार षटकांमध्ये ४ षटकांमध्ये तब्बल ४८ धावा दिल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सअंबाती रायुडू