IPL 2021, KKR vs PBKS, Live: अय्यर पुन्हा तळपला! केकेआरचं पंजाबसमोर विजयासाठी १६६ धावांचं आव्हान

IPL 2021, KKR vs PBKS, Live Updates: कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) पंजाब किंग्जसमोर (Punjab Kings) विजयासाठी १६६ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 09:21 PM2021-10-01T21:21:12+5:302021-10-01T21:23:46+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 KKR vs PBKS Live Updates Kolkata Knight Riders sets 166 run target against Punjab Kings | IPL 2021, KKR vs PBKS, Live: अय्यर पुन्हा तळपला! केकेआरचं पंजाबसमोर विजयासाठी १६६ धावांचं आव्हान

IPL 2021, KKR vs PBKS, Live: अय्यर पुन्हा तळपला! केकेआरचं पंजाबसमोर विजयासाठी १६६ धावांचं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, KKR vs PBKS, Live Updates: कोलकाता नाइट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) पंजाब किंग्जसमोर (Punjab Kings) विजयासाठी १६६ धावांचं आव्हान ठेवलं आहे. केकेआरला गवसलेला नवा हिरो व्यंकटेश अय्यरनं याही सामन्यात दमदार फलंदाजी करत खणखणीत अर्धशतकी खेळी साकारली. व्यंकटेशनं आपला फॉर्म कायम ठेवत आजच्या सामन्यात ४९ चेंडूत ६७ धावा कुटल्या. यात १ उत्तुंग षटकार आणि तब्बल ९ चौकारांचा समावेश होता. व्यंकटेशनं दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर राहुल त्रिपाठीनं उत्तम साथ देत २६ चेंडूत ३४ धावांचं योगदान दिलं. यावेळी शुबमन गिल काही चांगली कामगिरी करू शकला नाही. तो ७ धावा करुन माघारी परतला. अर्शदिप सिंगनं शुबमनची विकेट घेतली. अखेरच्या षटकांमध्ये नितीश राणानं जोरदार फटकेबाजी करत २ षटकार आणि २ चौकारांच्या साथीनं १८ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. तर दिनेश कार्तिकनं ११ चेंडूत ११ धावा केल्या. 

कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन मात्र याही सामन्यात स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद शमीनं मॉर्गनला (२) तंबूत धाडलं. पंजाबकडून अर्शदिप सिंगनं तीन गडी बाद केले. रवी बिश्नोईनं दोन विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीनं एक विकेट घेतली. अखेरच्या दोन षटकांमध्ये कोलकाताच्या धावसंख्येला वेसण घातली गेली. अखेरच्या १२ चेंडूंमध्ये केवळ १४ धावा कोलकाताला करता आल्या. व्यंकटेश अय्यर बाद झाला तेव्हा कोलकाताच्या ३ बाद १२० धावा झाल्या होत्या आणि सामन्याची पाच षटकं शिल्लक होती. त्यानंतर कोलकाताच्या धावसंख्येवर अंकुश ठेवण्यात पंजाबला यश आल्याचं पाहायला मिळालं आहे. २० षटकांच्या अखेरीस कोलकाताला ७ बाद १६५ धावा करता आल्या आहेत.

Web Title: IPL 2021 KKR vs PBKS Live Updates Kolkata Knight Riders sets 166 run target against Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.