IPL 2021, KKR vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; तीन मोठे बदल, KKRनंही आणला घातक फलंदाज

IPL 2021, KKR vs PBKS, Live: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात दुबईत (Dubai) सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 07:08 PM2021-10-01T19:08:47+5:302021-10-01T19:13:57+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 KKR vs PBKS Live: Punjab kings wins the toss and decides to bowl first | IPL 2021, KKR vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; तीन मोठे बदल, KKRनंही आणला घातक फलंदाज

IPL 2021, KKR vs PBKS, Live: पंजाबचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय; तीन मोठे बदल, KKRनंही आणला घातक फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, KKR vs PBKS, Live: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात दुबईत (Dubai) लढत सुरू आहे. सामन्याची नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. ख्रिस गेलनं बायो-बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्याजागी फॅबियन अॅलनचा समावेश करण्यात आला आहे. शाहरुख खान या युवा क्रिकेटपटूलाही संघात संधी देण्यात आली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिस याचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सनंही न्यूझीलंडचा घातक फलंदाज टीम सेफर्ट याला संधी दिली आहे. भारताचा युवा गोलंदाज शिवम मावी यालाही संघात स्थान देण्यात आलं आहे.

कोलकाता आणि पंजाब दोन्ही संघांसाठी आजचा सामना अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कोलकाताचा संघ सध्या १० गुणांसह चौथ्या स्थानावर असला तरी प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी कोलकाताला दमदार कामगिरी दाखवावी लागणार आहे. कारण मुंबई इंडियन्स देखील १० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्ज संघाला आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर यापुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. पंजाबनं आजचा सामना गमावला तर संघाचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं गणित बिघडणार आहे. 

कोलकाताच्या संघानं आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय कामगिरीची नोंद करत सर्वांना धक्का दिला आहे. गेल्या पाच सामन्यांमध्ये तीन सामन्यांत कोलकातानं विजय प्राप्त केला आहे. गेल्या सामन्यात कोलकाताला पराभवाला समोरं जावं लागलं होतं. पण त्याआधीचे दोन सामने कोलकातानं जिंकले आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जनं गेल्या सामन्यात विजय प्राप्त केला असला तरी त्याआधीचे दोन सामने पंजाबनं गमावले आहेत. गेल्या पाच सामन्यांपैकी पंजाबनं तीन सामने गमावले आहेत. तर दोन सामन्यांमध्येच यश प्राप्त करता आलं आहे. 

कोलकाता नाइट रायडर्स-
शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), टीम सेफर्ट, सुनील नरेन, टीम साऊदी, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी

पंजाब किंग्ज-
केएल राहुल, मयांक अग्रवाल, मार्करम, निकोलस पुरन, दीपक हुडा, फॅबियन अॅलन, शाहरुख खान, नॅथन एलिस, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, अर्शदिप सिंग

Web Title: IPL 2021 KKR vs PBKS Live: Punjab kings wins the toss and decides to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.