Join us  

IPL 2021: वॉर्नर, विल्यमसननं मन जिंकलं! राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा, पाहा Video 

IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारानं संघातील एकजूटीचं आणि सर्वधर्म समभावाचं दर्शन घडवत संघातील खेळाडूसोबत रोजा ठेवला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 12:23 PM

Open in App

IPL 2021: मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यातच यंदा आयपीएलचं आयोजन झालं आहे. रमजान महिन्यात रोजा ठेवला जातो. आयपीएलमधील काही खेळाडू देखील सध्या स्पर्धा सुरू असूनही रोजा देखील करत आहेत. यात सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारानं संघातील एकजूटीचं आणि सर्वधर्म समभावाचं दर्शन घडवत संघातील खेळाडूसोबत रोजा ठेवला आहे. 

IPL 2021: आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं!

सनरायझर्स हैदराबाद संघाचा अव्वल दर्जाचा फिरकीपटू राशिद खान यानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हैदराबादच्या संघातील मुस्लिम खेळाडूंना साथ देत संघातील काही स्टार खेळाडूंनीही रोजा ठेवला असल्याची माहिती राशिद खान यानं दिली आहे. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार केन विल्यमसन यांनी राशिद खानसोबत रोजा ठेवला आहे. (IPL 2021 Kane Williamson And David Warner Fast With Rashid Khan During Ramadan)

IPL 2021: सुटला...सुटला..सुटला अन् अखेरीस कसाबसा टिपला, अफलातून झेल एकदा पाहाच!

सनरायझर्सच्या संघात राशिद खान सोबतच मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान आणि खलील अहमद यांनी रोजा ठेवला आहे. रविवारी हैदराबादच्या संघाचा कोणताही सामना नव्हता मग केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर यांनीही आपल्या सहकारी खेळाडूंना साथ देत रोजा ठेवण्याचा निर्णय घेतला. राशिदनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये केन विल्यमसन आणि डेव्हिड वॉर्नर एका टेबलवर एकत्र बसलेले दिसत आहेत. राशिद खाननं कर्णधार वॉर्नरला रोजा ठेवल्याबाबतचा अनुभव विचारला त्यावर वॉर्नरनं उपाशी राहणं खूप कठीण काम असल्याचं म्हटलं आहे.

"रोजा खूप चांगली गोष्ट आहे. पण तितकंच ते कठीण काम आहे. मला खूप तहान आणि भूक लागलीय", असं वॉर्नरनं म्हटलंय. तर केन विल्यमसननं खूप चांगलं वाटतंय अशी प्रतिक्रिया दिलीय. वॉर्नर आणि विल्यमसन यांनीही आपल्यासोबत रोजा ठेवला असून त्याचा आनंद आहे, असं राशिद खाननं म्हटलं आहे. सोशल मीडियात राशिदचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१सनरायझर्स हैदराबादडेव्हिड वॉर्नर