IPL 2021: सुटला...सुटला..सुटला अन् अखेरीस कसाबसा टिपला, अफलातून झेल एकदा पाहाच!

IPL 2021, Deepak Hooda: पंजाब किंग्जच्या दीपक हुडानं टिपलेला एका झेलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. (IPL 2021 deepak hooda juggling catch of rishabh pant delhi capitals vs punjab kings)

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 10:06 AM2021-04-19T10:06:24+5:302021-04-19T10:07:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 deepak hooda juggling catch of rishabh pant delhi capitals vs punjab kings | IPL 2021: सुटला...सुटला..सुटला अन् अखेरीस कसाबसा टिपला, अफलातून झेल एकदा पाहाच!

IPL 2021: सुटला...सुटला..सुटला अन् अखेरीस कसाबसा टिपला, अफलातून झेल एकदा पाहाच!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Deepak Hooda: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमधील ११ व्या सामन्यात पंजाब किंग्ज (Punjab Kings) संघाला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. पंजाबच्या गोलंदाजांना दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. यात पंजाबच्या काही खेळाडूंकडून झेल सुद्धा सुटले. पण पंजाब किंग्जच्या दीपक हुडानं (Deepak Hooda) टिपलेला एक अफलातून झेल सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. खरंतर एक सोपा झेल दीपक हुडानं स्वत:च कठीण केला अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत आणि त्यावर दीपक हुडाची फिरकी घेत आहेत. (IPL 2021 deepak hooda juggling catch of rishabh pant delhi capitals vs punjab kings)

दीपक हुडानं दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतचा झेल टीपला खरा पण सोपा झेल असतानाही तो सहजपणे टिपला नाही. तो टीपण्यासाठी हुडाला खूप मेहनत घ्यावी लागली. अखेर चार प्रयत्नांच्या अखेरीस हुडानं रिषभ पंतचा झेल पूर्ण केला. झेल टिपल्यानंतर स्वत: दीपक हुडा देखील हसू लागला होता. पण पंजाब किंग्जचा संघ खूश होता. कारण दिल्लीच्या फॉर्मात असलेल्या कर्णधाराला बाद करण्यात यश आलं होतं. 

सामन्याच्या १८ व्या षटकात दिल्लीची फलंदाजी सुरू असताना हा प्रकार घडला. त्यावेळी दिल्लीला विजयासाठी १८ चेंडूत १६ धावांची गरज होती. रिषभ पंत स्ट्राइकवर होता आणि झाय रिचर्डसन गोलंदाजी करत होता. रिचर्डसननं धीम्या गतीनं चेंडू टाकला आणि रिषभनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूला हवी तशी दिशा मिळू शकली नाही. लाँग ऑनवर उभ्या असलेल्या दीपक हुडानं धाव घेत झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. एकदा नव्हे, तर चक्क तीनवेळा त्याच्या हातातून चेंडू निसटला अखेरीस चौथ्या प्रयत्नात दीपक हुडानं चेंडू यशस्वीरित्या टीपला आणि रिषभला बाद केलं. 

झेल टिपल्यानंतर दीपक हुडा देखील हसू लागला. कारण एक सोपा झेल त्यानं स्वत:च कठीण करुन ठेवला होता. पण अखेरीस यश प्राप्त झाल्यामुळे पंजाब किंग्जचा संघ खुश झाला. रिषभ पंतला स्वस्तात माघारी धाडण्यात पंजाबला यश आलं होतं. रिषभनं १६ चेंडूत केवळ १५ धावा केल्या आणि तो बाद झाला. पंत स्वस्तात बाद झाला असला तरी मार्कस स्टॉयनिस (२७) आणि ललित यादव (१२) यांच्या नाबाद खेळीनं दिल्लीला १९ व्या षटकात विजय प्राप्त करुन दिला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत दुसऱ्या तर पंजाबचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे. 
 

Web Title: IPL 2021 deepak hooda juggling catch of rishabh pant delhi capitals vs punjab kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.