Join us  

IPL 2021: भारतीयांना खूश ठेवणे आमची जबाबदारी; राजस्थानच्या अष्टपैलूचे ‘रॉयल’ वक्तव्य

IPL 2021: देशात सध्या कोरोन विषाणूची स्थिती बिकट झाली आहे. बहुतेक सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना आयपीएलचे सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सुरु आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 2:50 PM

Open in App

मुंबई : देशात सध्या कोरोन विषाणूची स्थिती बिकट झाली आहे. बहुतेक सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना आयपीएलचे सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत सुरु आहेत. यावरही अनेकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया आहेत. कोणी म्हणतंय, इतकी परिस्थिती गंभीर असताना आयपीएल का सुरु आहे, तर काहीजण म्हणतायत की, या नकारात्मक स्थितीमध्ये निदान क्रिकेटमुळे विरंगुळा होत आहे. अशा अनेक प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहेत. अशातच आता राजस्थान रॉयल्सचा सर्वात महागडा क्रिकेटपटू ख्रिस मॉरिस यानेही आपले मत व्यक्त केले असून आम्ही भारतीयांच्या आनंदासाठी खेळत आहोत, असे मत त्याने व्यक्त केले आहे. (IPL 2021 It is our responsibility to keep Indians happy Rajasthan all rounder chirs morris)

IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारीभारतातील कोरोनाच्या परिस्थितीवर राजस्थान संघामध्ये बरीच चर्चा झाल्याचे मॉरिसने सांगितले. भारतात दररोज कोरोनाचे ३ लाखहून अधिक केसेस समोर येत आहेत. शिवाय औषधे आणि ऑक्सिजन यांच्या कमतरतेमुळे परिस्थिती अधिक बिकट होत आहे. यावर मॉरिस म्हणाला की, ‘जे काही घडत आहे, ते समजण्यापलीकडे आहे.’IPL 2021: आयपीएलमधून बाहेर गेलेल्या स्टोक्सची भारतीय खेळपट्ट्यांवर टीका; म्हणाला ‘कचरा’

शनिवारी कोलकाता नाईट रायडर्सला नमवल्यानंतर मॉरिसने म्हटले की, ‘गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही भारतातील बिकट परिस्थितीवर बरीच चर्चा केली. पूर्ण भारतात नाही, पण काही भागांमध्ये कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर असल्याचे कळाले. पण आम्ही खेळ सुरु ठेवणार. जे काही घडतंय ते समजण्यापलीकडचे आहे. त्यामुळेच आमची जबाबदारी आहे की, चेहºयावर हास्य ठेवत खेळायचे. कारण आमच्याकडे हास्य ठेवण्याचे कारण आहे आणि आम्ही स्वस्थ असून आम्हाला क्रिकेट खेळण्यास मिळत आहे.’

IPL 2021: ख्रिस गेल झालाय 'मिस्टर इंडिया'मधील अमरिश पुरींचा फॅन, पाहा खास Video

मॉरिस म्हणाला की, ‘आशा करतो की, घरी बसून आम्हाला पाहणाºयांना आम्ही आनंद देऊ शकतो. आम्ही जिंकू किंवा हरु, लोकांना खूश करण्याची ही मिळालेली संधी आहे. जर आमच्या खेळाने लोकांना हसण्याची, आनंदी होण्याची संधी मिळत आहे, तर एक खेळ म्हणून आम्ही चांगले काम करतोय.’

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसन