IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी

मुंबई : आज मुंबईमध्ये यंदाच्या आयपीएलमधील अखेरचा सामना खेळवला जाईल. त्यातही हा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असा तुफानी असल्याने क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 02:07 PM2021-04-25T14:07:00+5:302021-04-25T14:09:10+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021Rival captains for CSK and RCB are a headache See statistics | IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी

IPL 2021: सीएसके आणि आरसीबीसाठी प्रतिस्पर्धी कर्णधार ठरत आहेत डोकेदुखी; बघा आकडेवारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आज मुंबईमध्ये यंदाच्या आयपीएलमधील अखेरचा सामना खेळवला जाईल. त्यातही हा सामना चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर असा तुफानी असल्याने क्रिकेटचाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. एका बाजूला कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आपल्या नेहमीच्या शैलीत भिडेल, तर दुसरीकडे फुल जोशमध्ये असलेल्या किंग विराट कोहलीची सेना सीएसकेविरुद्ध दोन हात करेल. त्याचप्रमाणे, आजच्या सामन्यात कोणता खेळाडू स्टार ठरणार यावर चर्चा सुरु असताना दोन्ही संघांना मात्र प्रतिस्पर्धी कर्णधारांची चिंता लागली आहे. कारण आकडेवारीनुसार दोन्ही कर्णधार एकमेकांच्या संघाविरुद्ध कमालीचे यशस्वी ठरले असून सर्वात आधी त्यांनाच रोखणे आवश्यक बनले आहे.

IPL 2021: ख्रिस गेल झालाय 'मिस्टर इंडिया'मधील अमरिश पुरींचा फॅन, पाहा खास Video

यंदाच्या सत्रात आरसीबीने जबरदस्त सुरुवात केली आहे. आतापर्यंत कामगिरीत सातत्याचा अभाव असलेल्या आरसीबीने यंदा सर्वांनाच चकित करताना सलग चार सामने जिंकताना गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळेच हा धडाका ते मुंबईत कायम राखतील असाच विश्वास आहे. परंतु, आता समोर आहे ती धोनीची सीएसके. त्यामुळे आरसीबीचे समर्थकही काहीप्रमाणात टेन्शनमध्ये आहेत. दुसरीकडे, चेन्नईने सलामीचा सामना गमावला असला, तरी यानंतर त्यांनी धडाक्यात पुनरागमन करताना सलग तीन सामने जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. सीएसकेची सरासरी आरसीबीच्या तुलनेत खूप चांगली असल्याने, आज जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत अव्वल स्थान राखेल हे निश्चित आहे.

IPL 2021: आयपीएलमधून बाहेर गेलेल्या स्टोक्सची भारतीय खेळपट्ट्यांवर टीका; म्हणाला ‘कचरा’

त्यामुळेच आता प्रत्यक्ष मैदानावर कोणता संघ सरस ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघांना विजयासाठी प्रतिस्पर्धी कर्णधाराला रोखणे आवश्यक बनले आहे. त्याला कारणही तसेच आहे. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून तो सीएसकेविरुद्धही हमखास यशस्वी ठरतो हे आकडेवारीवरुन कळून येते. कोहलीने आयपीएलमध्ये अनेक संघांविरुद्ध धावांचा डोंगर उभारला आहे. पण सीएसके बहुतेक त्याचा आवडता प्रतिस्पर्धी आहे. कोहलीने सीएसकेविरुद्ध सर्वाधिक ८८७ धावा चोपल्या आहेत. कोणत्याही फलंदाजाला सीएसकेविरुद्ध इतक्या धावा फटकावता आलेल्या नाहीत. त्यामुळे कोहलीचा धडाका रोखणे, हेच सीएसकेचे पहिले लक्ष्य असेल.

IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान

दुसरीकडे, धोनीही काही कमी नाही. धोनीच आयपीएलमध्ये सर्वाधिक ८२३ धावा आरसीबीविरुद्ध कुटल्या आहेत. इतकेच नाही, तर त्याने आरसीबीविरुद्धच सर्वाधिक ४५ षटकारही ठोकले आहेत. आरसीबीविरुद्ध इतके षटकार कोणालाच अद्याप मारता आलेले नाही.  शिवाय धोनीचा आयपीएलमधील सर्वोत्तम नाबाद ८४ धावांचा स्कोअरही आरसीबीविरुद्धच झाला आहे. त्यामुळे आरसीबीला धोनीचा धडाका रोखावाच लागेल. 
 

Web Title: IPL 2021Rival captains for CSK and RCB are a headache See statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.