IPL 2021: "धोनी पुढल्या वर्षी खेळला नाही तर 'त्या' दुसऱ्या 'कॅप्टन कूल'ला करा CSKचा कर्णधार"

IPL 2021: ३९ वर्षीय धोनीनं यंदाच्या आयपीएलनंतर कर्णधारपद सोडून देण्याची घोषणा केली तर चेन्नई सुपरकिंग्ज संघानं कोणत्या खेळाडूकडे संघाची धुरा द्यावी याबाबत भारतीय संघाचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा यानं मत व्यक्त केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 12:48 PM2021-04-29T12:48:59+5:302021-04-29T12:59:37+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 If MS Dhoni doesnt play next year you can bring in Kane Williamson as the CSK captain Pragyan Ojha | IPL 2021: "धोनी पुढल्या वर्षी खेळला नाही तर 'त्या' दुसऱ्या 'कॅप्टन कूल'ला करा CSKचा कर्णधार"

IPL 2021: "धोनी पुढल्या वर्षी खेळला नाही तर 'त्या' दुसऱ्या 'कॅप्टन कूल'ला करा CSKचा कर्णधार"

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, CSK: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघ पुन्हा एकदा आपल्या मूळ रुपात आलेला पाहायला मिळतोय. गेल्या वर्ष निराशाजनक कामगिरीची नोंद केल्यानंतर यंदा CSK नं पुनरागमन करत गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. पहिल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये संघानं विजय प्राप्त केला आहे. संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्व गुणांचं यावेळी कौतुक तर होतच आहे. पण धोनीची यंदाची शेवटची आयपीएल असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे धोनीनंतर चेन्नई सुपरकिंग्जचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

३९ वर्षीय धोनीनं यंदाच्या आयपीएलनंतर कर्णधारपद सोडून देण्याची घोषणा केली तर चेन्नई सुपरकिंग्ज संघानं कोणत्या खेळाडूकडे संघाची धुरा द्यावी याबाबत भारतीय संघाचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा यानं मत व्यक्त केलं आहे. (IPL 2021 If MS Dhoni doesn't play next year you can bring in Kane Williamson as the CSK captain says Pragyan Ojha)

IPL 2021: गेल्या वर्षी CSKचं नेमकं काय चुकलं?, महेंद्रसिंग धोनीनं अगदी सोप्या शब्दात सांगितलं...

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन याला चेन्नई सुपरकिंग्ज संघानं आपल्या ताफ्यात दाखल करुन त्याला संघाचं नेतृत्व करु द्यावं, असं मत प्रग्यान ओझा यानं व्यक्त केलं आहे. केन विल्यमसन सध्या सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळतो आहे. मैदानात कितीही दबाव असला तरी शांतवृत्तीसाठी ओळखल्या धोनीच्या स्वभावाशी केन विल्यमसन देखील मिळताजुळता आहे. केन विल्यमसन देखील जागतिक क्रिकेटमध्ये नम्रपणा आणि चिकाटीसाठी ओळखला जातो. पुढल्या वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव आयोजित केला जाणार आहे. त्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघानं केन विल्यमसनला ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं प्रग्यान ओझा म्हणाला. 

रवींद्र जडेजा उप-कर्णधार
"चेन्नई सुपरकिंग्ज संघात रवींद्र जडेजाला उपकर्णधार पदाची भूमिका दिली जाऊ शकते की जो संघाच्या कर्णधाराला मैदानात मदत करु शकेल. पण तुम्ही कर्णधाराच्या शोधात असाल तर केन विल्यमसनसारखा पर्याय शोधून सापडणार नाही", असं स्पष्ट मत प्रग्यान ओझा यानं व्यक्त केलं आहे. 
 

Web Title: ipl 2021 If MS Dhoni doesnt play next year you can bring in Kane Williamson as the CSK captain Pragyan Ojha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.