Join us

IPL 2021: "येत्या तीन वर्षात मला जगातील सर्वोत्तम फिनिशर व्हायचंय"

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये दाखल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यानं मोठं विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 17:06 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये दाखल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) यानं मोठं विधान केलं आहे. येणाऱ्या काळात आपलं लक्ष्य काय असेल हे स्टॉयनिसनं स्पष्ट केलं आहे. मार्कस स्टॉयनिस याला येत्या तीन वर्षात केवळ ऑस्ट्रेलियाचा नव्हे, तर जागतिक पातळीवर सर्वोत्तम फिनिशर व्हायचं आहे. 

'सचिनचा विक्रम मोडायचाय म्हणून कोहलीनं कॅप्टन्सी सोडली'

मार्कस स्टॉयनिस बऱ्याच कालावधीनंतर मैदानात पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यात स्टॉयनिसचा समावेश नव्हता. आता आयपीएलच्या माध्यमातून स्टॉयनिसला पुन्हा एकदा मैदानात उतरता येणार आहे. दुबईत क्वारंटाइनच्या नियमांचं पालन करत असलेल्या स्टॉयनिस यानं आपल्या आगामी प्लानिंगबाबतची माहिती दिली. 

मोठी बातमी! विराट कोहली आयपीएलनंतर RCB चंही कर्णधारपद सोडणार

"मी माझं लक्ष्य निश्चित केलं आहे. येत्या तीन वर्षात मला फक्त ऑस्ट्रेलियासाठी नव्हे, तर जागतिक स्तरावरील सर्वोत्तम मॅच फिनिशर व्हायचं आहे. क्वारंटाइनमधला माझा वेळ मी याच गोष्टीचा विचार करुन व्यतित केला आहे. यासाठीचीच तयारी करण्याचं मी ठरवलं आहे. अर्थात परिस्थितीनुसार खेळात बदल करणं गरजेचं आहेच. मेलबर्न स्टार्स संघासाठी देखील माझं हेच लक्ष्य असेल असं नाही. रिकी पॉन्टिंगच्या प्रशिक्षणाखाली दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची माझ्याकडे उत्तम संधी आहे", असं स्टॉयनिस म्हणाला. 

मार्कस स्टॉयनिस गेल्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी उत्तम मॅच फिनिशर आणि अष्टपैलू खेळाडू ठरला होता. संघाच्या गरजेनुसार त्यानं फलंदाजी आणि गोलंदाजी देखील केली होती. संघ संकटात असताना स्टॉयनिसनं संकटमोचकाची भूमिका पार पाडली होती. स्टॉयनिस एक असा खेळाडू आहे की जो एकहाती सामना जिंकून देऊ शकतो. 

टॅग्स :आयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्सआॅस्ट्रेलिया
Open in App