Join us

IPL 2021: राजस्थान रॉयल्सने दिल्या Earth Day च्या हटके शुभेच्छा!

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजु सॅमसन जसा शानदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तशीच ओळख सोशल मिडियावर राजस्थानच्या ट्विटर हँडलने मिळवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 17:29 IST

Open in App

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजु सॅमसन जसा शानदार फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तशीच ओळख सोशल मिडियावर राजस्थानच्या ट्विटर हँडलने मिळवली आहे. आपल्या हटके ट्विटसाठी राजस्थान रॉयल्सचे ट्विटर हँडल ओळखले जाते. आता राजस्थानने World Earth Day च्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. (IPL 2021 Happy Earth Day from Rajasthan Royals tweet goes viral on social media )

आयपीएलचे फॅन आहात? मग सोप्या प्रश्नांची उत्तर द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसे

"फक्त एकच ग्रह आहे ज्यावर क्रिकेट खेळता येऊ शकते. त्याची काळजी घ्या", राजस्थानचे हे ट्विट नेटिझन्सला आणि क्रिकेट प्रेमींना चांगलेच आवडले. त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

राजस्थान रॉयल्सचा गुरूवारी रॉयल चँलेजर बँगलोर सोबत सामना आहे. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थानचा संघ निश्चीतच उत्सुक आहे. सध्या राजस्थानचा संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानी आहे. राजस्थानने तीन पैकी एक सामना जिंकला आहे. तर दोन सामने गमावले आहेत. त्यासोबतच राजस्थानच्या संघाची कोविड चाचणी करणाऱ्या स्टाफचा फोटो पोस्ट करून त्यांचे आभार देखील ट्विटरवर मानले आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१राजस्थान रॉयल्सपृथ्वी