Join us

IPL 2021: 'बायो-बबल'मध्ये आता GPS ट्रॅकरनं ठेवली जाणार खेळाडूंवर नजर, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई!

IPL 2021: आयपीएलमध्ये 'बायो-बबल' भेदून कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) झोप उडाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 12:37 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये 'बायो-बबल' भेदून कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) झोप उडाली आहे. बीसीसीआयनं आता चेन्नईतील एका कंपनीकडून जीपीएल प्रणालीद्वारे 'बायो-बबल'मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सदस्यांवर नजर ठेवण्यासाठी यंत्राची खरेदी केली आहे. या जीपीएस यंत्रांद्वारे बायो-बबलमधील सदस्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे जेणेकरुन नियमांचा भंग झाल्यास त्याची तात्काळ पुष्टी शक्य होईल आणि योग्य तो निर्णय व्यवस्थापनाला घेता येईल. (IPL 2021: GPS-based tracker to monitor movement of individuals inside bio-bubble found faulty)

आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार

'जीपीएस ट्रॅकर' म्हणजे मनगटी घड्याळासारखं डिव्हाइस सर्वांना देण्यात येणार आहे. हे डिव्हाइस 'बायो-बबल'मध्ये सर्वांना २४ तास आपल्या मनगटात बांधून ठेवणं बंधनकारण असणार आहे. Bluetooth प्रणालीवर हे डिव्हाइस काम करणार असून प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीची माहिती यातून मिळणार आहे. 'बायो-बबल' नावाचं एक मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आलं आहे यात खेळाडूंच्या हालचालींची सर्व माहिती यात ट्रॅक केली जाणार आहे. 

IPL 2021: परदेशी खेळाडूंमध्ये कोरोनाची दहशत, IPL सोडण्याचा विचार; फ्रँचायझीनं केला खुलासा

दरम्यान, बायो-बबलमधील काही सदस्यांनी या ट्रॅकरबाबत तक्रारी देखील केल्याची माहिती समोर आली आहे. जीपीएस ट्रॅकर व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार सदस्यांनी केली आहे. संघ जेव्हा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करतो त्यावेळी प्रवासाची माहिती ट्रॅकरमध्ये व्यवस्थित जमा केली जात नसल्याची तक्रार काहींनी केली आहे. 

IPL 2021: कोरोनामुळे IPLबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय, सर्व सामने आता मुंबईत हलवणार?

आयपीएलमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंसह सपोर्ट स्टाफला बायो-बबलच्या नियमांचं पालन करणं बंधनकार आहे. बायो-बबलचे नियम असूनही कोलकाता नाइट रायडर्स संघातील वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे कोलकाता विरुद्ध बंगलोर सामना रद्द करावा लागला. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संघाचा गोलंदाची प्रशिक्षक लक्ष्मपती बालाची कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे बालाजीच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू सध्या क्वारंटाइन झाले आहेत. या पार्श्वभूमीवर चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यातील उद्याचा सामना देखील रद्द करण्यात आला आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्सकोरोना वायरस बातम्याकोलकाता नाईट रायडर्स