BREAKING: आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार

IPL 2021: CSK refuse to play against RR after staff members turn COVID positive आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनानं उद्याचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:46 AM2021-05-04T11:46:20+5:302021-05-04T11:47:16+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 CSK refuse to play against RR after staff members turn COVID positive match to be rescheduled | BREAKING: आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार

BREAKING: आयपीएलचा उद्याचा सामनाही रद्द; CSK नं खेळण्यास असमर्थता दर्शवली, खेळाडूंची दैनंदिन कोरोना चाचणी होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021: आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संघ व्यवस्थापनानं उद्याचा सामना खेळण्यास असमर्थता दाखवली आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात बुधवारी होणारा सामना देखील रद्द करण्यात आला आहे. (IPL 2021: CSK refuse to play against RR after staff members turn COVID positive; match to be rescheduled)

IPL 2021: परदेशी खेळाडूंमध्ये कोरोनाची दहशत, IPL सोडण्याचा विचार; फ्रँचायझीनं केला खुलासा

लक्ष्मीपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे आणि त्याच्याशी संपर्कात असलेले संघातील खेळाडूंच्या पुढील तीन चाचण्या जोवर निगेटिव्ह येत नाहीत तोवर संघ सामना खेळू शकत नाही, अशी भूमिका चेन्नई सुपरकिंग्ज संघानं घेतली आहे. संघाच्या खेळण्याबाबत चित्र स्पष्ट होण्यासाठी पुढील सहा दिवसांचा कालावधी लागेल असं चेन्नईकडून सांगण्यात आलं आहे. 

IPL 2021: कोरोनामुळे IPLबाबत BCCIने घेतला मोठा निर्णय, सर्व सामने आता मुंबईत हलवणार?

"दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणारा चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यातील उद्या होणारा सामना आयपीएलच्या कोरोना प्रतिबंधक नियमांनुसार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मपती बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं त्याच्याशी संपर्कात आलेल्या सर्व खेळाडूंना क्वारंटाइन नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्यांची दैंनदिन पातळीवर पुढील काही दिवस कोरोना चाचणी होणार आहे", असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

IPL 2021: कोरोना वाढतोय, आयपीएल थांबवा; दिल्ली हायकोर्टात याचिका, BCCI समोर पेच!

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा उद्याचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार होता. तो रद्द झाला असला तरी संघ व्यवस्थापनाच्या माहितीनुसार पुढील सहा दिवसांमध्ये चेन्नईची सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध देखील लढत नियोजित आहे. तोही सामना रद्द होणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यास पुढील सामन्यांवर गंडांतर येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Read in English

Web Title: IPL 2021 CSK refuse to play against RR after staff members turn COVID positive match to be rescheduled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.