Join us

IPL 2021 : ग्लेन मॅक्सवेलला रोखणे कठीणच!

ग्लेन मॅक्सवेलची वादळी खेळी सर्वांना सुधावून गेली. तो ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे यावरून अन्य संघ त्याला रोखू शकणार नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 09:30 IST

Open in App
ठळक मुद्देग्लेन मॅक्सवेलची वादळी खेळी सर्वांना सुधावून गेली. तो ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे यावरून अन्य संघ त्याला रोखू शकणार नाहीत.

स्ट्रेट ड्राईव्ह,सुनील गावस्करराजस्थानकडे प्ले ऑफकडे कूच करण्याची संधी होती. मात्र, हैदराबादचा सामना गमावून त्यांनी ती गमावली. दुसऱ्यांदा कर्णधारपदाला साजेशी खेळी करणाऱ्या सॅमसनला सहकाऱ्यांकडून साथ न मिळणे निराशादायी होते. मधल्या फळीने घात केला. फलंदाज गॅपमध्ये फटका मारण्याऐवजी उत्तुंग फटक्यांमागे धावले. नवे फलंदाज क्रीजवर असतील तर वेगवान धाव घेऊ शकतात. मात्र, येताच षट्कार ठाकून टाळ्या घेण्याचा नाद क्रिकेटला मागे ओढतो.  क्रीजवर आल्याआल्या षट्कार मारणारे सध्याच्या क्रिकेटमध्ये किती खेळाडू आहेत? गेल, पोलार्ड, रसेल, बटलर ही मोजकी नावे डोळ्यापुढे येतात. सर्वजणांची मजबूत काठी असल्याने त्यांना ते शक्य आहे. अन्य खेळाडूंनी स्वत:च्या मर्यादा ओळखाव्यात. ‘टॉप गियर’मध्ये न जाता हळूवार सुरुवात करावी लागेल.

हैदराबादविरुद्ध सकारियाला १२ षटकांपूर्वी पाचारण  न करीत सॅमसनने चूक केली. सकारिया अलगद बळी घेतो. त्याला लवकर आणले असते तर हैदराबादवर पकड निर्माण करणे शक्य होते. जेसन रॉय याने जोरदार फटकेबाजी करीत साहासोबत अर्धशतकी भागीदारी केली. कर्णधार केन विलियम्सनने देखील बळकटी प्रदान केली. त्याने फिनिशरची भूमिका बजावली. अन्य सामन्यांतही हा संघ असाच खेळला तर अन्य संघांना सावध राहावे लागेल. 

मुंबईवर मोठ्या विजयामुळे आरसीबी अव्वल स्थानाकडे कूच करीत आहे. ग्लेन मॅक्सवेलची वादळी खेळी सर्वांना सुधावून गेली. तो ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे यावरून अन्य संघ त्याला रोखू शकणार नाहीत. फलंदाजीसह तो फिरकी गोलंदाजीतही योगदान देत आहे. या दरम्यान केवळ धावा रोखल्या नाहीत तर बळीही घेतले. डिव्हिलियर्सची बॅट शांत असताना आरसीबी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हा मॅक्सवेलच्या कामगिरीचा परिणाम म्हणावा लागेल. यामुळे डिव्हिलयर्सवरील अपेक्षांचे ओझे कमी झाले. आरसीबीला सामना खेळण्याआधी पुरेशी विश्रांती मिळणार असल्याने उकाड्यात खेळताना त्यांना विश्रांतीचा लाभ होईल. 

टॅग्स :आयपीएल २०२१ग्लेन मॅक्सवेलरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स
Open in App