Join us

IPL 2021: कल्ला होणार...! स्टेडियमवर आवाssज घुमणार; IPL मध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार

IPL 2021: कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचं अर्धवट राहिलेलं पर्व आता १९ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 16:03 IST

Open in App

IPL 2021: कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचं अर्धवट राहिलेलं पर्व आता १९ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू होणार आहे. पहिलाच सामना दोन दिग्गज संघांमध्ये खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जची लढत होणार आहे. त्यात आता आणखी रंगत म्हणजे आयपीएलमधील सामन्यांसाठी आता स्टेडियमवर प्रेक्षकांचंही पुनरागमन होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) याबाबतचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

भारतीय खेळाडूंसाठी दिवाळी धमाका; बीसीसीआय पाडणार पैशांचा पाऊस?

यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थित राहता येणार आहे. यासाठीची तिकीट विक्री १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तिकीट खरेदी करता येणार आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे आता पुन्हा एकदा स्टेडियमवर आवाsssज घुमणार आहे.

IPL 2021आधीच विराट कोहलीला ICCनं दिली भेट; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचीही लागली लॉटरी!

कोरोनाच्या उद्रेकामुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना याआधी सामने खेळविण्याची नामुष्की क्रिकेटसह जगभरातील सर्वच खेळांवर आली होती. पण आता कोरोना विरोधी लसीकरणानं वेग घेतला आहे. तसंच कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन प्रेक्षकांना स्टेडियममध्ये हजेरी लावता येणार आहे. यासाठीची व्यवस्था बीसीसीआय आणि यूएईतील स्टेडियम व्यवस्थापन मंडळाकडून केली जात आहे. आयपीएलचं व्यवस्थापन सुरळीत पार पाडलं जावं यासाठी बीसीसीआयनं ४६ पानी हेल्थ अॅडव्हायझरी तयार केली आहे. त्याचं काटेकोर पद्धतीनं पालन करुन सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे. 

१९ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातील सामना दुबई येथे होणार आहे. त्यानंतर अबु धाबी येथे कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी शारजामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात लढत होणार आहे. दुबईच्या स्टेडियमवर १३, शारजावर १० आणि अबू धाबीच्या स्टेडियमवर एकूण ८ सामने होणार आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनमुंबई इंडियन्सबीसीसीआय
Open in App