Join us  

IPL 2021: आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं!

IPL 2021, Kagiso Rabada: दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब विरुद्धचा सामना अखेरीस जिंकला खरा पण गेल्या सीझनमधल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा भारतीय फलंदाजांनी घेतलेला समाचार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:26 AM

Open in App

IPL 2021, Kagiso Rabada: दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) यंदाच्या आयपीएल सीझनची सुरुवात होण्याआधीच मोठा झटका बसला होता. कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यामुळे संपूर्ण स्पर्धेबाहेर गेला. त्यानंतर संघाची धुरा युवा खेळाडू रिषभ पंतवर सोपविण्यात आली. त्यानंतर संघाला आणखी दोन धक्के बसले. फिरकीपटू अक्षर पटेलला कोरोना झाला आणि इशांत शर्माला देखील दुखापत झाली. त्यामुळे हे दोघंही सध्या एकही सामना खेळू शकलेले नाहीत. आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पक कॅपचा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा क्वारंटाइन असल्यानं पहिल्या सामन्याला मुकला. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रबाडाला संधी मिळाली. पण भारताच्या दोन युवा फलंदाजांनी रबाडाची जोरदार धुलाई करत त्याचं यंदाच्या सीझनमध्ये स्वागत केलंय. 

IPL 2021: सुटला...सुटला..सुटला अन् अखेरीस कसाबसा टिपला, अफलातून झेल एकदा पाहाच!

दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब विरुद्धचा सामना अखेरीस जिंकला खरा पण गेल्या सीझनमधल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा भारतीय फलंदाजांनी घेतलेला समाचार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. 

लोकेश राहुलनं पंजाब किंग्सच्या पराभवाचं खापर अम्पायरवर फोडलं?; केलं धक्कादायक विधान

कगिसो रबाडा भेदक मारा आणि अचूक टप्प्यात गोलंदाजीसाठी ओळखला जातो. कमीत कमी धावा देऊन विकेट्स मिळविण्यात रबाडाचा हातखंडा आहे. पण पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रबाडा पूर्णपणे अपयशी ठरताना दिसला. रबाडाच्या चार षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांनी तब्बल ४३ धावा कुटल्या. सामन्यात रबाडाचं पहिल षटक चांगलं गेलं. पहिल्या षटकात अवघ्या ५ धावा त्यानं दिल्या. पण खरी कहाणी दुसऱ्या षटकापासून सुरु झाली. 

मयांक अग्रवाल-केएल राहुलनं धू धू धुतलंपंजाब किंग्जच्या डावाचं ११ वं आणि कगिसो रबाडाचं हे वैयक्तिक दुसरं षटक होतं. रबाडाच्या या षटकातील पहिल्याच चेंडूवर मयांक अग्रवालनं लाँग ऑफच्या दिशेनं खणखणीत षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फाइन लेगवर अग्रवालनं षटकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर अग्रवालनं एक धाव घेतली. पुढचं काम केएल राहुलनं केलं. चौथ्या चेंडूवर राहुलनं हुक शॉट मारुन षटकातला तिसरा षटकार ठोकला. पाचव्या चेंड निर्धाव राहिला आणि सहाव्या चेंडूवर एक धाव आली. रबाडाचं हे षटक दिल्लीसाठी अतिशय महागात ठरलं. अव्वल दर्जाच्या गोलंदाजाच्या एका षटकात २० धावा आल्या होत्या. 

आयपीएलच्या गेल्या सीझनला म्हटलं होतं तुरुंगवासकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा १३ वा सीझन यूएईमध्ये खेळविण्यात आला होता. या सीझनमध्ये तब्बल ३० बळी घेत कगिसो रबाडा पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. पण कोरोनामुळे स्पर्धेवेळी खेळाडूंना बायो बबलच्या नियमांचं पालन करावं लागलं होतं. बायो बबलच्या नियमांचं पालन करतानाचा अनुभव सांगताना रबाडानं तुरुंगवासाचा अनुभव घेतल्याचं विधान केलं होतं. "बायो बबलमध्ये राहणं खूप कठीण होतं. सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेलं ते एक तुरुंगच होतं. आम्हाला स्वत:ला आठवण करुन द्यावी लागायची की आपण खूप नशिबवान आहोत की खेळायला मिळतंय. दुसरीकडे लोकांच्या नोकऱ्या जातायत, अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे कठीण परिस्थितीतही आयपीएल होऊ शकलं यासाठी आभार व्यक्त करायला हवेत", असंही रबाडा म्हणाला होता.  

टॅग्स :आयपीएल २०२१लोकेश राहुलमयांक अग्रवालदिल्ली कॅपिटल्सपंजाब किंग्स