IPL 2021, DC vs PBKS T20 : लोकेश राहुलनं पंजाब किंग्सच्या पराभवाचं खापर अम्पायरवर फोडलं?; केलं धक्कादायक विधान

IPL 2021 DC vs PBKS T20 : दिल्लीनं हा सामना ६ विकेट्स राखून जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आगेकूच केली. पंजाब किंग्सचे ४ बाद १९५ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सनं १८.२ षटकांत ४ बाद १९४ धावा करून सहज पार केले.

पंजाब किंग्सच्या ४ बाद १९५ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पृथ्वी शॉ आज आक्रमक मूडमध्ये होता, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र, शिखर धवननं ही उणीव भरून काढली.

त्यानं पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शिखर धवननं ४९ चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला. पण, त्यानं दिल्लीच्या विजयाचा पाया रचला होता.

मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) आणि लोकेश राहुल या दोघांनी १२२ धावांची विक्रमी भागीदारी केली. मयांक ३६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकारासह ६९ धावांवर माघारी परतला. लोकेश ५१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला.

दीपक हुडानं पहिलाच चेंडू सीमापार टोलावून त्याचा इरादा स्पष्ट केला. ख्रिस गेल ( ११) धावांवर माघारी परतला. निकोलस पुरन ( ९) आजही काही खास करू शकला नाही. पंजाब किंग्सला ४ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. दीपक हुडा २२ (१३ चेंडू) व शाहरुख खान १५ ( ५ चेंडू) धावांवर नाबाद राहिले.

दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनीही चांगली सुरूवात केली. पृथ्वी आज चांगल्या फॉर्मात दिसत होता आणि त्यानं काही सुरेख फटकेही मारले. पण, अर्षदीप सिंहनं DCला पहिला धक्का बसला. पृथ्वी १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३२ धावांवर बाद झाला आणि शिखरसोबतची त्याची ५९ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

DCकडून पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला ( ९) फार कमाल दाखवता आली नाही. या दोघांनी ३३ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली, परंतु त्यात धवनच्याच धावा जास्त होत्या. कर्णधार रिषभ पंत येताच दिल्लीनं धावांचा वेग वाढवला. चौकार-षटकारांची बरसात होऊ लागली. पण, त्याचे शतक पुन्हा हुकले.

धवननं तीन सामन्यांत १८६ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( १७६) व लोकेश राहुल ( १५७) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मार्कस स्टॉयनिसनं रिषभला साजेशी साथ दिली. मोहम्मद शमीनं टाकलेल्या १७व्या षटकात स्टॉयनिसनं फ्री हिटचा फायदा उचलताना २० धावा चोपल्या.

१८ चेंडूंत १६ धावांची गरज असताना रिषभ पंत ( १५) झेलबाद झाला. दीपक हुडानं सीमारेषेनजीक त्याचा झेल टिपला. ही कॅच पकडताना त्याचा जवळपास पाच प्रयत्न करावे लागले. १८व्या षटकात ललित यादवचा कॅच शमीला जज करता आला नाही आणि त्याचा झेल सूटला. दिल्लीन ६ विकेट्स व १० चेंडू राखून सामना जिंकला. दिल्लीनं ४ बाद १९८ धावा केल्या. स्टॉयनीस १३ चेंडूंत २७ धावांवर नाबाद राहिला.

सामन्यानंतर लोकेश राहुल म्हणाला, वाढदिवसाला विजयाची भेट मिळाली असती, तर अधिक आनंद झाला असता. या कामगिरीनं किंचितसा निराश आहे, परंतु अजून बरेच सामने शिल्लक आहेत. आम्हाला १०-१५ धावा कमी पडल्या. १९६ धावाही पुरेशा वाटत होत्या. वानखेडेवर ड्यू फॅक्टर महत्वाचा ठरला आणि शिखऱ धवनही जबरदस्त खेळला.''

''दवामुळे सामना दोलायमान अवस्थेत गेला. वानखेडेवर दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे नेहमी आव्हानात्मक असते. आम्ही याही परिस्थितीसाठी तयार असतो. अशा परिस्थितीत दर दोन षटकांनी चेंडू बदलत राहणे चांगले ठरले असते. आम्ही हरलो म्हणून हे बोलत नाही. मी अम्पायरकडेही अनेकदा चेंडू बदलण्याची मागणी केली होती, परंतु तसा नियम नाही,''असेही राहुल म्हणाला.