Join us  

IPL 2021, CSK vs PBKS T20 : चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) शुक्रवारी आयपीएल २०२१मधील पहिल्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 11:40 PM

Open in App

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) शुक्रवारी आयपीएल २०२१मधील पहिल्या विजयाची नोंद केली. पंजाब किंग्सविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईनं ६ विकेट्स व २६ चेंडू राखून विजय मिळवला आणि गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली. दीपक चहरनं ( ४-१३) सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना पंजाब किंग्सला ८ बाद १०६ धावांपर्यंत समाधान मानण्यास भाग पाडले. शाहरुख खाननं ( ४७) एकाकी झुंज दिली. चेन्नईनं हे लक्ष्य ६ विकेट्स व २६ चेंडू राखून सहज पार केले. महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) हा चेन्नई सुपर किंग्सकडून २०० वा सामना होता आणि विराट कोहलीनंतर ( RCB) एकाच फ्रँचायझीकडून दोनशे सामने खेळणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला. या सामन्यानंतर धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय.. महेंद्रसिंग धोनीनं केली विराट कोहलीला मदत; CSKच्या विजयानं RCBच्या नावे विक्रम

महेंद्रसिंग धोनी म्हणाला,''मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय. हा खूप लांबचा प्रवास होता. २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेतून या प्रवासाला सुरुवात झाली, त्यानंतर दुबई व घरच्या मैदानावर खेळतोय. यंदाच्या पर्वात मुंबईत घरचे सामने खेळावे लागतील, असा विचार केला नव्हता. येथील खेळपट्टी चांगली होती, परंतु त्याची नजाकत त्या दिवसाच्या हवामानावरही अवलंबून असते. चेंडू जास्त स्वींग होत नव्हता. दीपक चहरनं आज ज्या प्रकारे कामगिरी केली, मग त्याच्याकडून सुरुवातीलाच चार षटकं फेकून घेण्यात काहीच हरकत नव्हती. ड्वेन ब्राव्हो डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करतो.'' चार विकेट्स घेणाऱ्या दीपक चहरला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'जा जा'; Video Viral

''मोईल अलीला वरच्या क्रमांकावर फलंदाजी पाठवावे असे मला वाटले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायाचा वापर आम्ही केला, असेही धोनी म्हणाला.  

सामन्याचे हायलाईट्सदीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि त्यात १ निर्धाव षटकही टाकलं. २६ धावांवर पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्ससाठी झाय रिचर्डसन व शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. पण, मोईन अलीनं त्याच्या पहिल्याच षटकात रिचर्डसनचा ( १५) त्रिफळा उडवला. शाहरुख अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्यानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले.  

प्रत्युत्तरात मोईन अली व फॅफ ड्यु प्लेसिस यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. फॅफ व अलीनं काही नेत्रदिपक स्ट्रोक खेळले. मोईन ३१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांवर माघारी परतला. सुरेश रैना व अंबाती रायुडू झटपट बाद झाले, परंतु त्याचा सामन्याच्या निकालावर काहीच परिणाम झाला नाही. चेन्नईनं१५.४ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात हा सामना जिंकला. फॅफ ३३ चेंडूंत ३६ धावांवर नाबाद राहिला.   Veer Zaara प्रमाणे शाहरुख खाननं आयपीएलमध्येही प्रीती झिंटाला वाचवले, पाहा भन्नाट मीम्स

टॅग्स :आयपीएल २०२१महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्स