IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : Veer Zaara प्रमाणे शाहरुख खाननं आयपीएलमध्येही प्रीती झिंटाला वाचवले, पाहा भन्नाट मीम्स

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : आयपीएलच्या १४व्या पर्वात पहिल्याच सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings) तगड्या फलंदाजांनी शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) दीपक चहर ( Deepak Chahar) याच्यासमोर शरणागती पत्करली.

रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) नेहमीप्रमाणे क्षेत्ररक्षणात आपली कमाल दाखवताना PBKSचा कर्णधार लोकेश राहुलला ( KL Rahul) धावबाद केलं अन् युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचाही अफलातून झेल टिपला. महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) पहिल्या ७ षटकांत चहरकडून चार षटकं फेकून घेतली आणि त्याचा फायदा झाला. पंजाबचा निम्मा संघ पहिल्या सात षटकांत माघारी परतला. PBKSच्या शाहरुख खाननं ( Shahrukh Khan) एकट्यानं कडवी झुंज दिली.

दीपक चहरनं ४ षटकांत १३ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि त्यात १ निर्धाव षटकही टाकलं. २६ धावांवर पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर पंजाब किंग्ससाठी झाय रिचर्डसन व शाहरुख खान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ धावा जोडल्या. पण, मोईन अलीनं त्याच्या पहिल्याच षटकात रिचर्डसनचा ( १५) त्रिफळा उडवला.

शाहरुख अखेरपर्यंत खिंड लढवत राहिला. त्यानं ३६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४७ धावा केल्या. पंजाबला २० षटकांत ८ बाद १०६ धावांवर समाधान मानावे लागले. यानंतर सोशल मीडियावर प्रीती झिंटा आणि शाहरुख खान यांचे मीम्स व्हायरल झाले.