IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे आयपीएलमधील आजच्या सामन्यासाठी भलतेच आतुर झाले आहेत. हा सामना 'गुरू' महेंद्रसिंग धोनी आणि 'चेला' रिषभ पंत यांच्यात रंगणार असल्यानं शास्त्री यांनी मजेशीर ट्विट केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघासमोर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाचे आव्हान असणार आहे आणि दोन्ही संघांचा हा आयपीएल २०२१मधील पहिलाच सामना आहे. या सामन्याबद्दल शास्त्री यांनी ट्विट केलं की,''गुरू vs चेला. खूप मज्जा येणार आहे. स्टम्प माईकवरील संभाषण ऐकायला विसरू नका.'' अजिंक्य रहाणे की स्टीव्ह स्मिथ?; MS Dhoniचा सामना करण्याआधीच रिषभ पंत कन्फ्यूज!
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य अंतिम ११ शिलेदार ( DC likely playing XI vs CSK) - पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स/टॉम कुरन, आर अश्विन, प्रवीण दुबे/अमित मिश्रा, इशांत शर्मा, उमेश यादव IPL 2021 : CSK vs DC T20 Live Score Update रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं!
सुरेश रैनाच्या पुनरागमनाबाबत रिकी पाँटिंगनं महत्वाचं विधान सुरेश रैना जरी चेन्नईत दाखल झाला असला तरी त्याला संघानं प्रथमच करारबद्ध केल्यासारखं आहे. कारण गेल्या मोसमात तो एकही सामना खेळला नव्हता. त्यामुळे तो संघासाठी नवीनच आहे, असं विधान रिकी पाँटिंगनं केलंय. "चेन्नईचा संघ आयपीएलमधील एक यशस्वी संघ आहे. नक्कीच त्यांच्याकडे दमदार नेतृत्व आणि तितकेच दमदार खेळाडू देखील आहेत. खेळात सातत्य राखण्यासाठी ते ओळखले जातात. पण गेल्या वर्षीचा सीझन त्यांच्यासाठी निराशाजनक होता. सुरैश रैना त्यांच्या ताफ्यात नव्हता. आता तो संघात आलाय पण तो संघासाठी नवा खेळाडू असल्यासारखंच आहे. कारण तो गेल्या मोसमात एकही सामना खेळलेला नाही", असं रिकी पाँटिंग म्हणाला. CSK vs DC, CSK vs DC live score, IPL 2021, IPL 2021 latest news