IPL 2021 : CSK vs DC  T20 Live Score Update : CSK vs DC Playing XI : महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा रिषभ पंत ( Rishabh Pant) ७ वर्षांचा होता आणि आज १७ वर्षानंतर धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघासमोर रिषभ दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाचे आव्हान असणार आहे. धोनीकडून जे जे काही शिकलो आज त्याचाच वापर करणार असल्याचे, रिषभनं स्पष्ट केलं, परंतु परफेक्ट इलेव्हन निवडण्यापासूनच रिषभची कसोटी लागताना पाहायला मिळत आहे. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झाल्यानं यंदाच्या आयपीएलला मुकला अन् DCच्या कर्णधारपदाची माळ रिषभच्या गळ्यात पडली. आता अनेक अनुभवी खेळाडूंनासोबत घेऊन युवा रिषभला दिल्लीचे नेतृत्व करायचे आहे.  Live Score Updates IPL 2021साठी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा पाकिस्तानला ठेंगा; खवळलेल्या शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान

तिसऱ्या क्रमांकासाठी अजिंक्य की स्टीव्ह?
CSKविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग इलेव्हन निवडताना रिषभचा कस लागणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणेला संधी द्यायची की स्टीव्ह स्मिथला ( Rishabn Pant confused, Steve Smith or Ajinkya Rahane who to chose as No. 3?) यावरून तो कन्फ्यूज झाला आहे. या दोघांपैकी त्याला एकाची निवड करायची आहे. अजिंक्य व शिखर धवन ही जोडी सलामीला खेळवून स्मिथला तिसऱ्या स्थानावर खेळवण्याचा पर्यात त्याच्यासमोर आहे, परंतु रिषभ शेवटी काय निर्णय घेतो याची उत्सुकता आहे.  पृथ्वी शॉ फॉर्मात परतला आहे आणि त्याला डावलून चालणारे नाही.  CSK vs DC, CSK vs DC live score, IPL 2021, IPL 2021 latest news रोहित शर्मानं सामना गमावला पण मन जिंकलं; त्याच्या सामाजिक जाणीवेचे इंग्लंडच्या दिग्गजानं कौतुक केलं!

अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाचा मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे आणि त्याच्या नावावर कसोटीत ४५०० हून अधिका धावा आहेत. आयपीएलमध्ये अजिंक्य सलामीवीराच्याच भूमिकेत दिसला आहे. त्यानं ११२ सामन्यांत ३५.३३च्या सरासरीनं ३४६२ धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकं व ३४ अर्धशतकांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं १९ डावांमध्ये ३१६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ कसोटीत मधल्या क्रमांकावर खेळतो आणि त्याच्या नावावर ७ हजाराहून अधिक धावा आहेत. आयपीएलमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला आहे आणि ३९ सामन्यांत त्यानं १२२६ धावा केल्या आहेत.   vs DC IPL Matches, CSK vs DC IPL match 2021


दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य अंतिम ११ शिलेदार (  DC likely playing XI vs CSK) - पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत, मार्कस स्टॉयनिस, ख्रिस वोक्स/टॉम कुरन, आर अश्विन, प्रवीण दुबे/अमित मिश्रा, इशांत शर्मा, उमेश यादव 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2021 : CSK vs DC T20 : Rishabh Pant confused, Steve Smith or Ajinkya Rahane who to choose as No. 3?, Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.