Join us  

IPL 2021: आयपीएलमधून बाहेर गेलेल्या स्टोक्सची भारतीय खेळपट्ट्यांवर टीका; म्हणाला ‘कचरा’

आयपीएल म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. भल्यामोठ्या धावसंख्या उभारण्याच्या शर्यतीत गोलंदाजांची बेदम पिटाई होताना दिसते. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये चित्र थोडे वेगळे आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 1:06 PM

Open in App

मुंबई : आयपीएल म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. भल्यामोठ्या धावसंख्या उभारण्याच्या शर्यतीत गोलंदाजांची बेदम पिटाई होताना दिसते. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये चित्र थोडे वेगळे आहे आतापर्यंतच्या सत्रातील सगळे सामने चेन्नई आणि मुंबईत झाले. एकीकडे मुंबईमध्ये धावांचा डोंगर उभा राहत असल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे, चेन्नईत संघांना दीडशे धावा जमवतानाही दमछाक करावी लागत असल्याचे दिसत आहे. यावरुनच आता राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने टीका केली आहे. दुखापतीमुळे यंदाच्या सत्रातून माघार घ्यावी लागल्यानंतर स्टोक्सने सोशल मीडियाद्वारे ही टीका केली. (IPL 2021 Ben Stokes Lambasts Slow Chennai Tracks Says Trash Wickets Will Have Teams Scraping To Low Scores)

IPL 2021: ख्रिस गेल झालाय 'मिस्टर इंडिया'मधील अमरिश पुरींचा फॅन, पाहा खास Video

मुंबईच्या खेळपट्ट्यांवर २०० धावांचे लक्ष्यही पुरेसे नसल्याचे यंदा दिसून आले. त्याचवेळी चेन्नईमध्ये मात्र १५० धावांचे आव्हान गाठण्यातही अनेक संघांना अपयश आल्याचे दिसले. चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर फलंदाजी कठीण होत असल्याचे स्पष्ट झाले.

IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान

त्यामुळेच आता स्टोक्सने यावर टीका केली आहे. त्याने म्हटले की, आयपीएलमध्ये १६०-१७० किमान धावा निघाल्या पाहिजेत. १३०-१४० धावा नकोत. त्याचवेळी, स्पर्धा जसजसी पुढे जाईल, तसे खेळपट्ट्या आणखी खराब न होण्याची आशाही त्याने व्यक्त केली. स्टोक्सने ट्वीट केले की, ‘आशा करतो की, जसजसी आयपीएल स्पर्धा पुढे जाईल, तसे खेळपट्टी खराब न होवो. किमान १६०-१७० धावा व्हायला पाहिजेत. १३०-१४० धावा खेळपट्ट्यांना कचरा ठरवत आहेत.’

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला फक्त एका खेळाडूची वाटते भीती, प्रशिक्षकांनी सांगितला प्लान!

भारतात असेपर्यंत स्टोक्सने यावर एक शब्द काढले नव्हते. मात्र, आता मायदेशी इंग्लंडला परतल्यानंतर त्याने ट्वीटरवरुन आयपीएलवर टीका केली आहे. उजव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाल्याने त्याच्यावर लीड्समध्ये शस्त्रक्रिया झाली. यामुळे स्टोक्स आता किमान १२ आठवडे क्रिकेटपासून दूर राहिल.  

टॅग्स :आयपीएल २०२१बेन स्टोक्सराजस्थान रॉयल्सभारतीय क्रिकेट संघ