IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान

IPL 2021, Virender Sehwag: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) कामगिरी काठावर पास अशीच दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:03 PM2021-04-25T12:03:53+5:302021-04-25T12:05:41+5:30

whatsapp join usJoin us
RR camp does not look too happy with Sanju Samson being given the captaincy Virender Sehwag | IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान

IPL 2021: संजू सॅमसनला कॅप्टन केल्यानं राजस्थानचा संघ आनंदी झालेला दिसत नाही; सेहवागचं मोठं विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Virender Sehwag: आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) कामगिरी काठावर पास अशीच दिसत आहे. पंजाब किंग्ज विरुद्धचा पहिला सामना राजस्थाननं अखेरच्या चेंडूवर गमावला. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सलाही संघानं पराभूत केलं असलं तरी दोन पराभव देखील संघाला पत्करावे लागले आहेत. गुणतालिकेत राजस्थानचा संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे. 

IPL 2021: धोनीनं जडेजावर सोपवली मोठी जबाबदारी; आज मॅक्सवेल मैदनात येताच होणार खेळ खल्लास!

राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व यंदा युवा क्रिकेटपटू संजू सॅमसन याच्याकडे सोपविण्यात आलं आहे. संघ अतिशय मजबूत असतानाही यंदाच्या सीझनमध्ये राजस्थानसमोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या दिसत आहे. संघातील अनेक महत्वाचे खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सला फक्त एका खेळाडूची वाटते भीती, प्रशिक्षकांनी सांगितला प्लान!

राजस्थानकडून मैदानात सांघिक कामगिरी अभाव दिसत असल्याचं विधानही माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा यांनी केलं होतं. ओझाच्या याच विधानाशी सहमती दाखवत भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं मोठं विधान केलं आहे. "संजू सॅमसनला कर्णधार केल्यानं संघातील इतर खेळाडू कदाचित खूश झालेले दिसत नाहीत. पण एक खेळाडू जो आपल्यासोबतच असतो आणि अचानक त्याला संघाचा कर्णधार केलं जातं अशावेळी सर्वांना त्याच्याशी जुळवून घेण्याला थोडा वेळ जातो हे देखील तितकंच खरं आहे", असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. 

"जेव्हा एखादा गोलंदाज फलंदाजाकडून खूप मार खात असतो. तेव्हा कर्णधारानं कोणतेही आढेवेढे न घेता गोलंदाजाच्या जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवून आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे. त्यानं गोलंदाज सकारात्मक विचार करु लागतो. त्यालाही वाटतं संघाच्या कर्णधाराला आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे कर्णधारानं संवाद वाढवणं गरजेचं आहे. जेव्हा राजस्थानच्या संघातील फलंदाज चांगली कामगिरी करत नाही किंवा परदेशी खेळाडू देखील एकमेकांसोबत जास्त बोलत नाहीत. त्यामुळेच राजस्थानचा संघ एक संघ दिसत नाही", असं सेहवागनं म्हटलं. 
 

Web Title: RR camp does not look too happy with Sanju Samson being given the captaincy Virender Sehwag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.