Join us  

IPL 2021: इंग्लंड क्रिकेट बोर्डाची 'गुगली', IPL स्पर्धेला मोठा धक्का, वर्ल्डकपसाठी आखली जबरदस्त रणनिती

IPL 2021 – England Players IPL 2021: आयपीएलचं अर्धवट राहिलेलं सीझन १९ सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर येणार आहे. पण त्याआधीच स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 10:32 AM

Open in App

IPL 2021 – England Players IPL 2021: आयपीएलचं अर्धवट राहिलेलं सीझन १९ सप्टेंबरपासून पुन्हा रुळावर येणार आहे. पण त्याआधीच स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतलेली असतानाच आता इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानं आणखी एक 'गुगली' टाकली आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडच्या संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभागी होता येणार नाही असा निर्णय इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानं घेतल्याची माहिती यूकेतील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. त्यामुळे बीसीसीआयसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

विराट कोहली कर्णधारपद सोडणार? मुंबईचा 'वीर' टीम इंडियाची धुरा सांभाळणार

आयपीएलनंतर यूएईमध्येच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आयपीएलचं व्यग्रे वेळापत्रक आणि सततचे सामने यामुळे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास त्याचा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज घेत इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. 

भारत आणि इंग्लंडमधील पाचवी कसोटी रद्द करण्याच्या निर्णयावरुन उभय देशांच्या क्रिकेट बोर्डामध्ये वाद निर्माण झाले आहेत. त्यात आता इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डानं आयपीएलमधून इंग्लंडच्या खेळाडूंची माघार घोषीत करुन बीसीसीआयसमोर नवा पेच निर्माण केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टी-२० वर्ल्डकपसाठी इंग्लंडच्या अंतिम १५ जणांच्या संघात निवडले गेलेले खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असणार नाहीत. यामुळे जवळपास १० खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नाहीत. असं झाल्यास आयपीएलमध्ये इंग्लंडचा जॉर्ज गार्टन हा एकटाच खेळाडू उपलब्ध होईल. आयपीएलचे प्लेऑफसामने १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळविण्यात येणार आहे. 

टॅग्स :IPL 2020आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनइंग्लंडभारतभारतीय क्रिकेट संघ
Open in App