Join us  

IPL 2021: बेअरस्टोनंतर आता रायुडूनं फोडला फ्रीज, कसलाच खणखणीत फटका मारला; पाहा दमदार VIDEO

IPL 2021: आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अंबाती रायुडूनं आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रायुडूनं अवघ्या २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. यात ७ उत्तुंग षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 11:06 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अंबाती रायुडूनं आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रायुडूनं अवघ्या २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. यात ७ उत्तुंग षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. (ipl 2021 ambati rayudu smashes a six and breaks a glass mi vs csk)

अंबाती रायुडूनं त्याच्या खेळीत एकूण ७ षटकार लगावले पण त्यातील एका षटकारानं लक्ष वेधून घेतलं. मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रायुडूनं असला खणखणीत षटकार लगावला की चेंडू जाऊन थेट मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमधील फ्रीजच्या काचेच्या दरवाजावर जाऊन आदळला. रायुडूचा प्रहार इतका जोरदार होता की फ्रीजच्या दरवाजाचा चक्काचूर झाला. 

यंदाच्या आयपीएलमध्ये याआधी सनरायझर्स हैदराबादच्या जॉनी बेअरस्टो यानं मुंबई इंडियन्सविरोधातच लगावलेल्या षटकारामुळे डगगाऊटमधील फ्रीज फुटला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स विरोधातील सामन्यातच फ्रीजचा दरवाजा फुटला आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्सअंबाती रायुडू