IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला घरी परतताच थेट हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:23 AM2021-05-07T11:23:45+5:302021-05-07T11:24:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: After returning from IPL, RR’s Chetan Sakariya’s spends days at hospital for COVID-19 positive father | IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

IPL 2021 स्थगितीनंतर घरी परतताच चेतन सकारियाला मिळाली वाईट बातमी, घ्यावी लागली हॉस्पिटलमध्ये धाव!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगचे १४ वे पर्व स्थगित झाल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू आपापल्या घरी परतले. कोरोना संकटात कुटुंबीयांना भेटताना सर्वांना खूप आनंद झाला. पण, राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला घरी परतताच थेट हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली. चेतनचे वडील कांजीभाई यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांना गुजरातमधील वर्तेज येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. विराट कोहली-अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात घेतला सहभाग; केली दोन कोटींची मदत!

चेतननं गेल्या आठवड्यात वडिलांच्या प्रकृतीबाबत सांगितले होते आणि आयपीएल २०२१मधून मिळालेला पगार त्यानं त्वरित घरी पाठवला होता. घरी परतल्यानंतर तो सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या बाकावरच बसून होता. त्याच्या वडिलांना मधुमेहाची समस्या आहे आणि आता कोरोना झाल्यानं तो चिंतीत आहे. ''काही दिवसांपूर्वी मला राजस्थान रॉयल्सकडून पगार मिळाला होता आणि तो मी लगेच घरी ट्रान्सफर केला. त्यानं या कठीण काळात माझ्या कुटुंबीयांना मदत झाली,''असे चेतननं Indian Expressशी बोलताना सांगितले.  न्यूझीलंडचे सर्व खेळाडू मायदेशी परतले, पण केन विलियम्सनसह तिघे भारतातच राहिले; जाणून घ्या कारण

सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतनसाठी आयपीएलमधून मिळणारे पैसे हे घर चालवण्यासाठी खूप मोठं हातभार लावणारे आहेत. २३ वर्षीय चेतनला आयपीएल २०२१च्या लिलावात १.२० कोटीला राजस्थाननं करारबद्ध केलं.'' लोकं म्हणतात आयपीएल रद्द करा, मी त्यांना काहीतरी सांगू इच्छितो. माझ्या घरात मीच एकटा कमावता आहे आणि क्रिकेट हे एकमेव माझ्या उत्पन्नाचे साधन आहे. आयपीएलमधून मिळालेल्या पैशांतून वडिलांना चांगले उपचार देऊ शकलो. जर ही स्पर्धा झाली नसती तर मला खूप कठीण गेलं असतं. मी एका गरीब कुटुंबातूनआ आलोय आणि माझ्या वडिलांनी टॅम्पो चालवून घराचा गाढा हाकला आहे. आयपीएलनं माझं आयुष्य बदललं आहे,''असेही चेतन म्हणाला. चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार!

सय्यद मुश्कात ट्रॉफीत खेळत असताना चेतनच्या घरी एक दुर्दैवी घटना घडली. त्याच्या लहान भावानं आत्महत्या केली. चेतन स्पर्धेत खेळत असल्यानं घरच्यांनी त्याला ही गोष्ट कळू दिली नाही. भावाच्या आठवणीत चेतननं एक भावनिक पोस्ट लिहिली होती.   चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार!


आयपीएल २०२१ चेतननं सात सामन्यांत सात विकेट्स घेतल्या आणि त्या लोकेश राहुल. महेंद्रसिंग धोनी आणि मयांक अग्रवाल या मोठ्या फलंदाजांच्या विकेट्सचा समावेश होता.   

Web Title: IPL 2021: After returning from IPL, RR’s Chetan Sakariya’s spends days at hospital for COVID-19 positive father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.