India tour of England 2021: चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार!

India tour of England 2021: Predicting Team India's probable 30-man squad for 4-month long trip

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 09:52 AM2021-05-07T09:52:34+5:302021-05-07T09:53:48+5:30

whatsapp join usJoin us
India tour of England 2021: Predicting Team India's probable 30-man squad for 4-month long trip | India tour of England 2021: चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार!

India tour of England 2021: चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१४वी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) आता अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर भारतीय खेळाडूंचा संपूर्ण फोकस आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर केंद्रीत केला आहे. भारतीय संघa  Team India पुढील महिन्यापासून इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे आणि कोरोनाचे नियम व १४ दिवसांचा क्वारंटाईन लक्षात घेता जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतीय खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होतील. भारतीय संघ १८ ते २३ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा सामना करेल, त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका. चार महिन्यांच्या या दौऱ्यासाठी बीसीसीआय आज टीम इंडियाची घोषणा करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआय ३० जणांचा जम्बो संघ पाठवण्याच्या तयारीत आहेत. WTC final squad : ४ सलामीवीर, ९ जलदगती गोलंदाज अन् २-३ यष्टिरक्षक; BCCI निवडणार टीम इंडियाचा जम्बो संघ!

कोरोना परिस्थितीत इंग्लंडमध्ये सराव सामन्यांचे आयोजन होणं, अवघड आहे. त्यामुळे जम्बो संघ पाठवून त्यातून दोन संघ तयार करून टीम इंडियाला सराव सामनेही खेळता येतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर पृथ्वी शॉ यानं विजय हजारे ट्रॉफी व आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे पुनरागमन होऊ शकते. त्याशिवाय अभिमन्य इस्वरन, प्रियांक पांचाळ व देवदत्त पडीक्कल यांचीही नावं चर्चेत आहेत. मधल्या फळीत हनुमा विहारीचे पुनरागमन होईल, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विहारीनं आर अश्विनसह टीम इंडियाची खिंड लढवली होती, परंतु चौथ्या कसोटीतून दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली.  

अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याचेही पुनरागमन निश्चित आहे. त्यालाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाली होती. हार्दिक पांड्या तंदुरुस्त दिसत असला तरी तो अजूनही गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे त्याला संधी देण्यात काहीच अर्थ नाही. वॉशिंग्टन सूंदर त्याचे स्थान पक्के करून आहे. आर अश्विन, अक्षर पटेल आणि राहुल चहर हे फिरकीची जबाबदारी सांभाळतील. राहुल चहरची नेट बॉलर म्हणून निवड केली जाईल. जसप्रीत बुमराह लग्नानंतर टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला प्रसिद्ध कृष्णा व आवेश खान ही नवी जोडी असू शकते. भुवनेश्वर कुमारही पुनरागमनासाठी सज्ज आहे. चेतन सकारिया व अंकित राजपूत यांची नेट बॉलर म्हणून निवड केली जाऊ शकते. 

असा असू शकतो ३० जणांचा जम्बो संघ
 India's likely 30-man squad for tour of England (including World Test Championship))

  • सलामीवीर - रोहित शर्मा, शुबमन गिल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, अभिमन्यू इस्वरन, प्रियांक पांचाळ/देवदत्त  पडिक्कल
  • मधली फळी - चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, लोकेश राहुल
  • अष्टपैलू खेळाडू - वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या
  • फिरकीपटू - आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर
  • जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, भुवनेश्वर कुमार 

नेट बॉलर - चेतन सकारिया, अंकित राजपूत 
 

Web Title: India tour of England 2021: Predicting Team India's probable 30-man squad for 4-month long trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.