Join us  

IPL 2020 : दुसऱ्या Super Overचा सामना करण्यापूर्वी रागात होता ख्रिस गेल; युनिव्हर्स बॉसचा धक्कादायक खुलासा, Video

Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील १८ ऑक्टोबरचा दिवस खऱ्या अर्थानं सुपर संडे ठरला. एकाच दिवशी तीन Super Overचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 19, 2020 4:14 PM

Open in App

Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील १८ ऑक्टोबरचा दिवस खऱ्या अर्थानं सुपर संडे ठरला. एकाच दिवशी तीन Super Overचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुपारच्या सत्रातील सामना सुपर ओव्हरमध्ये KKRनं जिंकला. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) आणि मुंबई इंडियन्सन ( MI) यांच्यात डबल सुपर ओव्हर झाली. Kings XI Punjabनं हा सामना जिंकला, परंतु ख्रिस गेल ( Chris Gayle) प्रचंड नाराज दिसला. दुसऱ्या Super Overसाठी मैदानावर उतण्यापूर्वी गेल प्रचंड रागात होता आणि सामन्यानंतर त्यानं याबाबतचा धक्कादायक खुलासा केला. मयांक अग्रवालची सुपर डाईव्ह!; मुंबई इंडियन्सला 'या' चुका पडल्या महागात

मुंबई इंडियन्सच्या ६ बाद १७६ धावांच्या प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हन पंजाबलाही ५ बाद१७६ धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर Super Overमध्ये प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबला जसप्रीत बुमराहनं ५ धावांवर रोखलं. पण, मोहम्मद शमीनंही टिच्चून मारा करताना मुंबई इंडियन्सला ५ धावा करू दिल्या.  दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सकडून किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानावर उतरले. ख्रिस जॉर्डननं दोन वाइड बॉल टाकून मुंबईच्या धावसंख्येत वाढ केली. पण, अखेरच्या चेंडूवर पोलार्डनं टोलावलेला चेंडू अडवून मयांक अग्रवालनं संघासाठी चार धावा वाचवल्या. हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला अन् मुंबईला 1 बाद 11 धावांवर समाधान मानावे लागले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ख्रिस गेलनं पंजाबवरील दडपण हलकं केलं. त्यानंतर मयांक अग्रवालनं दोन चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला.   

सामन्यानंतर मयांक अग्रवाल, ख्रिस गेल आणि मोहम्मद शमी यांच्या चर्चेचा एक व्हिडीओ आयपीएलच्या वेबसाईटवर अपलोड केला गेला. त्यात गेलने नाराजी प्रकट केली. तो म्हणाला,''दुसऱ्या सुपर ओव्हरचा सामना करण्यापूर्वी मी घाबरलो नव्हतो. मी रागात आणि निराश होतो. कारण, आम्ही स्वतःच स्वतःला या परिस्थितीत आणलं होतं.'' 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :IPL 2020ख्रिस गेलकिंग्स इलेव्हन पंजाबमुंबई इंडियन्समयांक अग्रवालमोहम्मद शामी