मुंबई : मुंबई : गतविजेत्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना विक्रमी सहाव्यांदा Indian Premier League (IPL 2020) च्या अंतिम फेरीत धडक मारली. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ५७ धावांनी धुव्वा उडवताना दिमाखात अंतिम फेरी गाठली. फलंदाजांच्या तडाखेबंद फटकेबाजीला गोलंदाजांच्या भेदकतेची जोड मिळाली आणि दिल्लीची वाताहत झाली. त्याचवेळी, या सामन्याआधी मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड (Shane Bond) यांनी एक वक्त्यव्य केले होते आणि त्याची प्रचिती या सामन्याच्या निमित्ताने आले.
दिल्लीकडे अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी असून त्यांना दुसऱ्या क्वालिफायर लढतीत सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळावे लागेल. मुंबईने ५ बाद २०० धावा उभारल्यानंतर दडपणाखाली आलेल्या दिल्लीकरांनी २० षटकात ८ बाद १४३ धावाच केल्या.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीने धावांचे खाते उघण्याआधीच ३ प्रमुख फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी, तर ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात २ बळी घेत दिल्लीचे मानसिक खच्चीकरण केले होते. तरीही मार्कस स्टोइनिस (६५) आणि अक्षर पटेल (४२) यांनी ७१ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या आशा कायम ठेवल्या होत्या.
मात्र या सामन्याआधी मुंबईचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी एक वक्तव्य केले होते आणि त्याचाच प्रत्यय या सामन्यात आला. बाँड म्हणाले होते की, ह्यआमची फलंदाजी खूप चांगली आहे. तसेच आमची गोलंदाजीही जबरदस्त आहे. माझ्या मते आमच संघ असा आहे, ज्याचा सामना करण्याची कोणाचीही इच्छा नाही. कारण सर्वांना माहितेय की, आमच्याविरुद्ध खेळताना त्यांना मोठे नुकसान होऊ शकते.ह्ण
बाँड पुढे म्हणाले होते की, ह्यआमच्याकडे असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे स्पर्धा जिंकण्याचा चांगला अनुभव आहे. मोठ्या सामन्यांत, दडपणाच्या परिस्थिती कसा खेळ करावा, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने मैदानावर उतरणार असून हाच दोन संघांमध्ये फरक ठरु शकेल.ह्ण त्यामुळेच मुंबईने दिल्लीविरुद्ध मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर बाँड यांच्या वक्त्यव्याची प्रचिती सर्वांनाच आली आहे.